vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्याप्रदेश

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी जिल्ह्यात ६९.९१ टक्के मतदान*

*जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी जिल्ह्यात ६९.९१ टक्के मतदान*

 रायगड- प्रतिनिधी :- रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका २०२६ करिता (शनिवार, दि.७ फेब्रुवारी) रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. यामध्ये जिल्ह्यात सरासरी- ६९.९१ टक्के मतदान झाले आहे.

      जिल्ह्यात तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे,पनवेल तालुक्यात स्त्री मतदान ९५ हजार ६३८, पुरुष मतदान १ लाख हजार १६१, इतर १ असे एकूण १ लाख ९५ हजार ८०० असून मतदानाची टक्केवारी ६९.९८ टक्के.

 कर्जत तालुक्यात स्त्री मतदान ६३ हजार ९७५, पुरुष मतदान ६६ हजार ७७६ असे एकूण १ लाख ३० हजार ७५१ असून मतदानाची टक्केवारी ७६.६० टक्के.  खालापूर-तालुक्यात स्त्री मतदान ४१ हजार ९७, पुरुष मतदान ४३ हजार २०९, इतर २ असे एकूण ८४ हजार ३०८ असून मतदानाची टक्केवारी ७५.९७ टक्के.

 सुधागड तालुक्यात स्त्री मतदान १७ हजार १९४, पुरुष मतदान १८ हजार ५३१ असे एकूण ३५ हजार ७२५ असून मतदानाची टक्केवारी ६६.१६ टक्के.

पेण तालुक्यात स्त्री मतदान ५१ हजार ७०, पुरुष मतदान ५४ हजार ८३ असे एकूण १ लाख ५ हजार १५३ असून मतदानाची टक्केवारी ७५.३९ टक्के. उरण तालुक्यात स्त्री मतदान ४१ हजार ८५४, पुरुष मतदान ४१ हजार २०४, इतर १ असे एकूण ८३ हजार ५९ असून मतदानाची टक्केवारी ७६.५४ टक्के.

 अलिबाग-तालुक्यात स्त्री मतदान ७४ हजार ९६९, पुरुष मतदान ७६ हजार ८१४ असे एकूण १ लाख ५१ हजार ७८३ असून मतदानाची टक्केवारी ७५.१७ टक्के.

 मुरुड-तालुक्यात स्त्री मतदान २० हजार १८७, पुरुष मतदान १९ हजार ५०२ असे एकूण ३९ हजार ६८९ असून मतदानाची टक्केवारी ७१.४४ टक्के.  रोहा-तालुक्यात स्त्री मतदान ४२ हजार ३०१, पुरुष मतदान ४५ हजार ४६७ असे एकूण ८७ हजार ७६८ असून मतदानाची टक्केवारी ६८.१६ टक्के.

तळा-तालुक्यात स्त्री मतदान ८ हजार ६६, पुरुष मतदान ८ हजार ५८२ असे एकूण १६ हजार ६४८ असून मतदानाची टक्केवारी ५१.८३ टक्के.  माणगाव-तालुक्यात स्त्री मतदान ४१ हजार ८०४, पुरुष मतदान ४४ हजार २१ असे एकूण ८५ हजार ८२५ असून मतदानाची टक्केवारी ६१.५१ टक्के.  म्हसळा-तालुक्यात स्त्री मतदान ११ हजार ६२४, पुरुष मतदान १० हजार ७३४ असे एकूण २२ हजार ३५८ असून मतदानाची टक्केवारी ५१.३६ टक्के.

 श्रीवर्धन-तालुक्यात स्त्री मतदान १६ हजार ७३४, पुरुष मतदान १४ हजार ८७९ असे एकूण ३१ हजार ६१३ असून मतदानाची टक्केवारी ५५.६३ टक्के. महाड-तालुक्यात स्त्री मतदान ४५ हजार ५०८, पुरुष मतदान ४८ हजार ३६ असे एकूण ९३ हजार ५४४ असून मतदानाची टक्केवारी ६७.०८ टक्के. पोलादपूर- तालुक्यात स्त्री मतदान ११ हजार ८८३, पुरुष मतदान १२ हजार ८९७ असे एकूण २४ हजार ७८० असून मतदानाची टक्केवारी ६३.१५ टक्के असे जिल्ह्यात एकूण ६ लाख ४ हजार ८९६ पुरुष तर ५ लाख ८३ हजार ९०४ , इतर ४ असे एकूण ११ लाख ८८ हजार ८०४मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सी भाडेवाढ* *१ एप्रिलपासून नवे दर लागू*

उत्तराखंड राज्यातील धराली (जि. उत्तरकाशी) येथील भूस्खलन आणि पूरसदृश परिस्थिमुळे प्रभावित झालेले महाराष्ट्राच्या विविध भागातील एकूण १५१ पर्यटक असून ते सुरक्षित आहेत…

पोलीस दलाला बळकटी देणाऱ्या देखण्या प्रशासकीय इमारती

महाराष्ट्र शासनाचे चार, आठ, नऊ व ११ वर्षे मुदतीचे प्रत्येकी १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

आदिवासी समाजाची संस्कृती आणि परंपरा जपा – आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे आवाहन

पेण येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन