vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

केंद्रीय मंत्री जुएल ओराम यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तयारीचा घेतला आढावा,योग हा केवळ एक व्यायाम नाही तर शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील एकतानता साधण्याचा मार्ग: केंद्रीय मंत्री जुआल ओराम.

केंद्रीय मंत्री जुएल ओराम यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तयारीचा घेतला आढावा,योग हा केवळ एक व्यायाम नाही तर शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील एकतानता साधण्याचा मार्ग: केंद्रीय मंत्री जुआल ओराम.

राज्य प्रतिनिधी यावर्षीच्या योग दिनी समावेशक आणि सामुदायिक नेतृत्वाखालील कार्यक्रमांच्या आवश्यकतेवर आदिवासी व्यवहार मंत्री जुएल ओराम यांनी भर दिला आहे.यावेळी आदिवासी भागात हा कार्यक्रम आधुनिक योगासह स्थानिक पारंपरिक आरोग्य पद्धतींचा अनोखा संगम सादर करेल असे ओराम म्हणाले. योग प्रात्यक्षिके,आरोग्य सत्रे आणि जागरूकता कार्यक्रमांद्वारे आदिवासी समुदायांच्या सक्रिय सहभागाला त्यांनी प्रोत्साहन दिले.- आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी आदिवासी मंत्रालयाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ओराम या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीला मंत्रालयाचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.सध्या सुरू असलेल्या धरती आबा जनभागीदारी या देशव्यापी जागरूकता आणि लाभ संतृप्ति मोहिमेचा एक प्रमुख भाग म्हणून योग दिवस साजरा केला जाणार आहे.

योग हा केवळ एक व्यायाम नाही तर शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील एकतानता साधण्याचा मार्ग आहे, असे त्यांनी योगाचे महत्त्व सांगताना स्पष्ट केले. निसर्गाशी आणि पारंपारिक उपचार पद्धतींशी खोलवर रुजलेल्या संबंधामुळे आदिवासी समुदाय या सुसंवादाचे प्रतीक आहेत, असे ते म्हणाले. यावर्षीचा योग दिन आधुनिक आणि स्वदेशी आरोग्य प्रणालींचा उत्सव बनेल याची ग्वाही आपण दिली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

या उत्सवाचा एक भाग म्हणून, 477 एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील (ईएमआरएस) अंदाजे 1.4 लाख विद्यार्थी आणि 10 लाखांहून अधिक आदिवासी नागरिक आगामी योग सत्रांमध्ये आणि संबंधित उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे.दिनाचे समारंभ यशस्वी करण्यासाठी आयुष मंत्रालये, राज्य आदिवासी कल्याण विभाग, आदिवासी संशोधन संस्था, ईएमआरएस, आश्रम शाळा, ट्रायबल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया (ट्रायफेड),राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त आणि विकास महामंडळ (एनएसटीएफडीसी) आणि इतर भागधारकांशी प्रभावी समन्वय साधण्याचे आवाहनही ओराम यांनी केले आहे. संवाद आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म, कम्युनिटी रेडिओ आणि स्थानिक आदिवासी भाषांचा वापर केला पाहिजे असे ते म्हणाले.

 

संबंधित पोस्ट

संगीताद्वारे आध्यात्मिक उन्नती’ या विषयावर परिसंवाद; कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग-संगीताच्या माध्यमातून साधना करण्यासाठी मार्गदर्शन करणारे गोव्यातील प्रस्तावित विश्वविद्यालय लवकर व्हावे ! – पू. पं. केशव गिंडे*

खामगावचा गुरुवारचा आठवडी बाजार पुढे ढकलला

vishwatmaklokswamivarta

ठाणे, पालघरसह कोकणातील धरणांमध्ये मुबलक जलसाठा नद्यांमध्ये विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नवीन 125रास्तभाव दुकानांसाठी अर्ज मागवल*1 ते 15 ऑगस्ट दरम्यान करता येणार अर्ज

विभागीय क्रीडा संकुल समिती बैठक-प्रवेशासाठी डिजीटल पडताळणी पद्धतीचा अवलंब;ज्येष्ठ नागरिकांना नाममात्र शुल्क आकारण्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

सर्वांसाठी घरे हे ध्येय साकारण्यासाठी प्रत्येक मंडळात क्लस्टर विकसित करु – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे