vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत एफएसएसएआय आणि बृहन्मुंबई महानगरपालिका संयुक्तपणे मुंबईतील 10000 स्ट्रीटफूड विक्रेत्यांना देत आहेत प्रशिक्षण

अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत एफएसएसएआय आणि बृहन्मुंबई महानगरपालिका संयुक्तपणे मुंबईतील 10000 स्ट्रीटफूड विक्रेत्यांना देत आहेत प्रशिक्षण…

राज्य प्रतिनिधी-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने  (एफएसएसएआय) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) सहकार्याने, मुंबईतील स्ट्रीट फूड विक्रेत्यांना  म्हणजेच रस्त्यावर  खाद्य पदार्थ विकणाऱ्याना  सक्षम करण्यासाठी एक परिवर्तनकारी अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. राष्ट्रीय ईट राईट इंडिया चळवळीचा एक भाग म्हणून, या उपक्रमाचे उद्दिष्ट स्वच्छतेची मानके उंचावणे आणि शहरात उच्च-दर्जाच्या सुरक्षित स्ट्रीट फूडचा अनुभव खवय्यांना देणे हे आहे.

जानेवारी ते जून 2025 दरम्यान, 12 हून अधिक प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये बृहन्मुंबईतील सुमारे 2,000 स्ट्रीट फूड विक्रेत्यांचा सहभाग होता. ही सत्रे अंधेरी, बोरिवली, चंदनवाडी, कांदिवली, भायखळा, गिरगाव चौपाटी, खार आणि चेंबूर यासारख्या प्रमुख स्ट्रीट फूड हबमध्ये झाली, ज्यामध्ये अन्न सुरक्षा संबंधी सर्वोत्तम पद्धतींचा व्यापक अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यात आले.हा प्रयत्न एफएसएसएआय आणि बीएमसी यांच्यातील धोरणात्मक सामंजस्य कराराशी सुसंगत आहे, जो तळापर्यंत अन्न सुरक्षा वाढवण्याप्रति त्यांच्या संयुक्त वचनबद्धतेला बळकटी देतो.

नागपूर, बुलढाणा आणि ठाणे यासारख्या महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांसह राज्यभरात 5,700 हून अधिक विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, जे या उपक्रमाची व्याप्ती आणि वाढता प्रभाव दर्शवितात.

प्रशिक्षण सत्रात वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षित अन्न हाताळणी, पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी साठवणूक नियम आणि योग्य कचरा विल्हेवाट यासारख्या महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले. राष्ट्रीय अन्न सुरक्षा मानकांची पूर्तता करण्यासाठी तयार केलेल्या या सत्राने विक्रेत्यांना त्यांचे कामकाज सुधारण्याबरोबरच ग्राहकांचा विश्वास मजबूत करण्याचे ज्ञान देखील दिले.

संबंधित पोस्ट

माळेगाव यात्रेतील पशुप्रदर्शन स्पर्धेत शेतकरी विनायक थोरात यांच्या देवणी वळूंनी मारली बाजी…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र ज्ञानसभा २०२६’ चे थाटात उद्घाटन!

vishwatmaklokswamivarta

शहापूरच्या माळरानावर ग्रह-नक्षत्रांची फुले फुलली ठाणे जिल्ह्यातील पहिल्या तारांगणाचे शहापूरला उद्घाटन …

बालकांच्या अनधिकृत संस्थांवर कठोर कारवाई होणार – आयुक्त नयना गुंडे यांची माहिती

राज्यपालांच्या हस्ते लोकभवनात इतिहास व अभिलेख दालनाचे उद्‌घाटन दालनात १५० वर्षांमधील निवडक छायाचित्रे व दस्तावेजांचे प्रदर्शन

नवी मुंबई विमानतळावर सेलिब्रिटी आणि VVIP साठी एक विशेष योजना, 2030 पर्यंत पूर्ण होणार काम..