vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नवीन 125रास्तभाव दुकानांसाठी अर्ज मागवल*1 ते 15 ऑगस्ट दरम्यान करता येणार अर्ज

नवीन 125रास्तभाव दुकानांसाठी अर्ज मागवल*1 ते 15 ऑगस्ट दरम्यान करता येणार अर्ज

अमरावती, प्रतिनिधी: जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये 125 नवीन रास्तभाव दुकानांना मंजुरी देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुरवठा शाखेकडून जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार, पात्र संस्था व बचत गटांकडून या दुकानांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे.

नवीन रास्तभाव दुकान मंजुरीसाठी शासनाच्या नियमांनुसार संस्था, गटांना प्राधान्य दिले जाणार आहे. ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयं साहाय्यता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, संस्था नोंदणी अधिनियमांतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा न्यास यांना परवाने देण्यात येणार आहे.

मंजूर केलेल्या रास्तभाव दुकानांचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदाय, गटाद्वारे करणे आवश्यक राहील. भातकुली – मक्रंदाबाद, मक्रमपूर, बोकुरखेडा, उदापूर, मलकापूर, नवथळ बू., कारखेडा, अडवी, कोलटेक, खालकोनी, देगूरखेडा, कृष्णापूर, तिवसा – जहांगीरपूर, आलवाडा, तळेगाव ठाकुर, चांदुर बाजार – अब्दलपूर, मौजखेडा, पिंपरी तळेगाव, वारोळी, खरवाडी, हिरापूर, अचलपूर – गोंडविहीर, कोठारा, जवर्डी, मेघनाथपूर, खतिजापूर, वाल्मीकपूर, सावळी खु., खानापूर, शहापूर, परतवाडा, अचलपूर, खैरी, सांगवी, दर्यापूर – चंद्रपूर, नांदुरा, ईटकी, सौदळी हिरापूर, सोनखेड, रुस्तमपूर, शहापूर, चांदुर जहानपूर, बनोसा, अंजनगाव सुर्जी – सर्फाबाद, औरंगपूर, कालवाडा, सैदापूर, कोठा, बोरगाव अंबाडा, वरुड – जामगाव, पिंपलागड, नागझरी, नांदगाव खंडेश्वर – निभोरा लाहे, जसापूर, भगुरा, बोरगाव, पिंपरी, खरबी गुंड, नांदगाव खं., नांदगाव ख., घारफळ, वढाळा, पळसमंडळ, पुसनेर, कोदरी, राजना, संग्रामपूर, चिखली वैदय, चिखलदरा – कुही, भुत्रुम, भिरोजा, केशरपूर, भांडुम, ढाकणा, खिरपाणी, पांढराखडक, डोमी, माडीझडप, आवागड, सलोना, टेटू, ढोमणीफाटा, लवाद वन, चिलाटी, रामटेक, कुलंगणा बु., चौऱ्यामल, शहापूर, मोझरी, बागलिंगा, लवादा, सुमिता, सलिता, खटकाली, मोर्शी – अंबाडा, हाशमपूर, धारणी – झिल्पी, खिडकी, कंजोली, दिया, रोरा, हरीसाल, चित्री, नांदुरी, अमरावती (ग्रामीण) – पुसदा, जामडोल, ब्राम्हणवाडा गोंविदपूर, माळेगाव, पिंपळविहीर, नांदुरा बु., कामुंजा, कुंड सर्जापूर, कुऱ्हाड, मोगरा, हातला, पिंपळखुटा, चांदुर रेल्वे – सातेफळ, चांदुरखेडा, येरड, चांदुर रेल्वे, कोदरी हरब, धामणगाव रेल्वे – धामणगाव रेल्वे, रामगाव, वकनाथ, गिरोली या गावांमध्ये नवीन दुकानांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

यासाठी आवश्यक असणारे अर्ज संबंधित तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत. अर्जाचे शुल्क 100 रूपये असून चलानाद्वारे भरणा करूनही अर्ज प्राप्त करता येईल. 15 ऑगस्टनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, अशी माहिती प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रज्वल पाथरे यांनी दिली आहे.

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र शिक्षक पात्रता 2025 परीक्षा आवेदनपत्रासाठी 3 ऑक्टोबरची मुदत

vishwatmaklokswamivarta

दी सह्याद्री सहकारी बँकेच्या अध्यक्षांच्या तक्रारी संदर्भात चौकशी करून कार्यवाही– सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे घेणार विभागाचा आढावा नागरिकांसोबत साधणार संवाद..

vishwatmaklokswamivarta

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत तटरक्षक दलाचा ४९ वा स्थापना दिन उत्साहात

vishwatmaklokswamivarta

सेवा हक्क कायद्याचा व्यापक प्रचार करा – राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीच्या शासनातर्फे करण्यात येणा-या पूर्वतयारीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा