vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त विशेष लेख)-तंबाखूला नाही म्हणूया, आयुष्य सुंदर जगूया!”

 जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त विशेष लेख)-तंबाखूला नाही म्हणूया, आयुष्य सुंदर जगूया!”

राज्य प्रतिनिधी

तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या गंभीर आजारांविषयी जनजागृती करणे आणि लोकांना तंबाखूचे सेवन थांबवण्यासाठी प्रेरित करणे, या हेतूने दरवर्षी ३१ मे हा दिवस ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ म्हणून साजरा केला जातो. (जागतिक तंबाखू विरोधी दिनाची स्थापना १९८७ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) सदस्य राष्ट्रांनी केली. तंबाखू उत्पादनांमुळे लोक, सार्वजनिक आरोग्य, समुदाय आणि पर्यावरणाला होणाऱ्या हानींबद्दल जागरूकता निर्माण करणे हा यामागचा हेतू.) जागतिक तंबाखू विरोधी दिनाची या वर्षाची थीम “आकर्षणाचा मुखवटा उतरवूया – तंबाखू आणि निकोटिन उत्पादनामागील उद्योगाच्या क्लृप्त्या उघड करूया” ही आहे.

जागतिक प्रौढ तंबाखू निरीक्षण २०१६-१७ (Gats) नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्यांचे प्रमाण हे तरूण पिढीमध्ये वाढत चालले आहे. (तंबाखू उद्योगाकडून ई-सिगारेट आणि गरम केलेल्या तंबाखू उत्पादनांसारख्या नवीन निकोटिन उत्पादनांचा प्रचार विशेषतः चिंताजनक आहे. या उत्पादनांमध्ये अनेकदा असे स्वाद आणि रंगीबेरंगी डिझाइन असतात जे महिला आणि तरुणांना आकर्षित करतात,) धूम्रपान (सिगारेट, बिडी) व गुटखा, पानमसाला, तंबाखू चघळणे अशा माध्यमातून तंबाखू सेवन केल्यास शरीरावर अतिशय घातक परिणाम होतात. तंबाखूमुळे विविध आजार होतात. तोंड, स्वरयंत्र, फुफ्फुस, गळा, अन्ननलिका, मुत्राशय तसेच नाक, पोट, गर्भाशय मुखाचा कर्करोग होतो. त्याचबरोबर इतर विविध आजार उद्भवतात. तोंडाच्या कॅन्सरमध्ये ल्युकोप्लेकिया, एरिर्थोप्लेकिया, सबम्युकस फाइब्रोसिस व उपचार न करता येणारा अल्सर यासारखे आजार उद्भवतात

या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जनजागृती होणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, सांगली अंतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणी सन २०१६-१७ पासून सांगली जिल्ह्यामध्ये सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात येते. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जूनच्या पहिल्या पंधरवड्यात तंबाखू विरोधी जनजागृतीपर विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत.

याचबरोबर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन सोडविण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय शिराळा, इस्लामपूर, कवठेमहांकाळ तसेच ग्रामीण रुग्णालय कडेगाव, पलूस, विटा, तासगाव, आटपाडी व जिल्हास्तरावर तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तंबाखू सेवन सोडविण्यासाठी या तंबाखूमुक्ती समपुदेशन केंद्राची अथवा १८००-११-२३५६ या Quit Line ची सहाय्यता मिळते. तसेच, अनेक तंबाखूविरोधी मोहिमा शासन व स्वयंसेवी संस्था स्तरावर राबवल्या जात आहेत.

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ उत्पादन कायद्यातंर्गत सार्वजनिक ठिकाणी व शालेय परिसरात दंडात्मक कारवाई करण्यात येते. यामध्ये कलम 4 नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी आहे. कलम 5 नुसार तंबाखूजन्य पदार्थाच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातीवर बंदी घालण्यात आली आहे. कलम 6 (अ) नुसार 18 वर्षाखालील व्यक्तिंना तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी आहे. तर, कलम 6 (ब) सर्व शैक्षणिक संस्थांच्या 100 यार्ड परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. नुकताच सांगली जिल्हा तंबाखूमुक्त शाळा जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आला आहे. कलम 7 नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या वेष्टनावर केंद्र शासनाने निर्देशित केलेल्या आरोग्याबाबतीत धोक्याची सूचना (80 टक्के भाग व्यापलेला असावा) छापणे बंधनकारक करण्यात आले आहे.

त्यामुळे पुढच्या पिढीचे रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करावा व तसेच शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांनाही तंबाखूच्या व्यसनांपासून दूर ठेवण्याचा संकल्प करूया. तंबाखूमुक्त सांगली जिल्ह्यासाठी, सार्वजनिक आरोग्य जपण्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी तंबाखूला नाही म्हणूया…   (संकलन – जिल्हा माहिती कार्यालय, सांगली)

संबंधित पोस्ट

पुनर्वसनाच्या ठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्या- सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत‍ छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले…

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करावेॲपद्वारे प्रक्रिया सुलभ ; अनुदान बंद होऊ नये म्हणून प्रशासनाचे आवाहन

नागरिकांनी खादीचा वापर वाढवावा – जिल्हाधिकारी आशिष येरेकर कुटीर महोत्सवाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरी करणार; राज्यभर जलपूजन व विविध उपक्रम मृद व जलसंधारण विभागाचा शासन निर्णय निर्गमित

डॉ. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण: पंकजा मुंडे यांच्या पीएला अटक

vishwatmaklokswamivarta

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर