vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

 

राज्य प्रतिनिधी-अधिसूचना सर्व विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही सार्वजनिक सुट्टी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदारसंघाबाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे

महानगरपालिका क्षेत्रांतील केंद्रशासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका व तत्सम आस्थापनांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या महानगरपालिकांमध्ये बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे.

मतदारांनी मतदानासाठी लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

खटाव व दहिवडी येथील मुलांच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु

राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे राज्य पुरस्कृत योजनेचा लाभ घ्यावा इच्छुकांनी सबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये दि.31 जुलै 2025 पर्यंत अर्ज प्रत्यक्ष सादर करावे-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे

दिव्यांग क्षेत्रातील संस्था, संघटनांना दि.३० पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोसल’ उपक्रमातून उच्च व तंत्र शिक्षण विभागात प्रलंबित फाईली निकाली निघण्याचा धडाका विभागातील ४ हजार ४७० प्रकरणे निकाली

vishwatmaklokswamivarta

महाकुंभमेळ्याला ‘फालतू’ म्हणणार्‍या लालूप्रसाद यादव यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी  

vishwatmaklokswamivarta

पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री