vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समाजहितासाठी उद्योग क्षेत्राचे योगदान प्रेरणादायी

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समाजहितासाठी उद्योग क्षेत्राचे योगदान प्रेरणादायी.

मुंबई, प्रतिनिधी : अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने सामाजिक उत्तरदायित्वातून (सीएसआर) बालरुग्णांसाठी कर्करोग निदान सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे ९४ बालकांच्या आणि त्यांच्या पालकांच्या जीवनात नवी उमेद जागविण्याचे प्रेरणादायी काम झाले आहे,अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सुविधेचे कौतुक केले आहे.

अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने २०२५-२६ मध्ये शिक्षण, आरोग्य सेवा आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांमध्ये सीएसआरच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले आहेत. त्यामध्ये शिक्षण क्षेत्राला विशेष प्राधान्य असले तरी आरोग्य क्षेत्रातही महत्वाचे काम केले आहे. देशभरातील कर्करोगाचा संशय असलेल्या बालरुग्णांसाठी तातडीची निदान सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमाअंतर्गत अफकॉन्सने टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या माध्यमातून ‘Emergency Diagnostic Support for Children with Suspected Cancer’ या योजनेसाठी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. या सहाय्यामुळे देशभरातील ९४ बालकांना कर्करोगाचे तातडीने निदान आणि आवश्यक वैद्यकीय तपासण्या उपलब्ध होऊ शकल्या.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कर्करोगासारख्या गंभीर आजारामध्ये वेळेवर निदान होणे अत्यंत महत्त्वाचे असते. आर्थिक अडचणींमुळे अनेक कुटुंबांना आवश्यक तपासण्या करता येत नाहीत. अशा परिस्थितीत अफकॉन्सने दिलेली मदत केवळ आर्थिक सहाय्य नसून अनेक बालकांच्या उपचार प्रक्रियेला गती देणारी आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणारी ठरली आहे. शासनाच्या प्रयत्नांना उद्योग क्षेत्राची अशी साथ मिळाल्यास आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासाची उद्दिष्टे अधिक वेगाने साध्य होऊ शकतात. म्हणूनच समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील भागीदारी अधिक बळकट होणे आवश्यक आहे.

कॉर्पोरेट क्षेत्राच्या सामाजिक बांधिलकीचे हे एक उत्कृष्ट उदाहरण ठरत असल्याचे नमूद करुन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अफकॉन्सने शिक्षण क्षेत्राबरोबरच महिला सक्षमीकरण आणि आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये केलेली गुंतवणूक ही शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. समाजातील गरजू घटकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अशा सीएसआर उपक्रमांची भूमिका अत्यंत मोलाची ठरते.

0000

संबंधित पोस्ट

बुलडाण्यातील 66 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 8 जुलैला राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन

निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही

आज मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची बिनविरोध निवड. 

vishwatmaklokswamivarta

प्रॉपर्टी एक्स्पो 2025’ प्रदर्शनाची नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केली पाहणी- प्रदर्शनातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या माहितीप्रद स्टॉलला अनेक विकासक व नागरिकांची भेट

vishwatmaklokswamivarta

शासनाच्या ‘दुर्गोत्सव’ उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका आयोजित ‘दुर्गबांधणी स्पर्धा’ उपक्रमात मोठ्या संख्यने सहभागी होण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

सातारा व दहिवडी येथील सरदार @ १५० युनिटी मार्च पदयात्रेमध्ये नागरिकांना सहभाग घेण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta