vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईत आयोजित पूर्वांचल महोत्सव माटी ९ या महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जम्मू-काश्मीरचे उप राज्यपाल मनोज सिन्हा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि मान्यवर उपस्थित होते

मुंबईत आयोजित पूर्वांचल महोत्सव माटी ९ या महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जम्मू-काश्मीरचे उप राज्यपाल मनोज सिन्हा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि मान्यवर उपस्थित होते

राज्य प्रतिनिधी-मुंबई विद्यापीठ, कलिना,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पूर्वांचल महोत्सव माटी ९ मुंबई’ मध्ये प्रमुख उपस्थिती दर्शवत संबोधित केले. ‘केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय’,’माटी – ए पब्लिक ट्रस्ट’ व ‘कलिना विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, डुमरियागंजचे खासदार जगदंबिका पाल, माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी, माटी महोत्सवाचे आयोजक आसिफ आझमी, मॉडर्न ग्रुप कंपनीचे ज्ञानप्रकाश सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,

भारतीय संस्कृतीला समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्र आणि पूर्वांचलने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विविध प्रदेश, भाषा आणि परंपरांमध्ये एकात्मता निर्माण करून भारतीय संस्कृती अधिक समृद्ध करण्याचे कार्य ‘पूर्वांचल महोत्सव माटी ९ मुंबई’ सारख्या उपक्रमातून होत आहे. मुंबईमध्ये मिनी पूर्वांचल वसले आहे. त्यांच्याकडे पाहून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चे दर्शन होते. महाराष्ट्र आणि पूर्वांचलातील संतांनी समाजाला भक्तीमार्गावर आणत संस्कृतीचे जतन केले आहे. पूर्वांचलमधील ‘काशी’ ही भारताच्या संस्कृतीचे, अध्यात्माचे आणि ज्ञानपरंपरेचे सर्वात मोठे केंद्र असून गंगेच्या प्रवाहाइतकीच प्राचीन काशीची ज्ञानधारा आजही अखंडपणे वाहत आहे.

पूर्वांचलने आपली सांस्कृतिक ओळख अत्यंत अभिमानाने जतन केली असून, यात धोबिया, बिरहा, नौटंकी आणि चैतीसारख्या समृद्ध लोककलांचा समावेश आहे. येथील प्रसिद्ध बनारस आणि लखनऊ घराण्यांनी संगीत जगताला अमूल्य देणगी दिली आहे. कला आणि खाद्यसंस्कृतीच्या बाबतीतही पूर्वांचल आघाडीवर आहे.

जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले, या महोत्सवातून महाराष्ट्र आणि पूर्वांचल यांचे संबंध अधिक दृढ होतील. पूर्वांचल हा केवळ भौगोलिक प्रदेश नसून समृद्ध परंपरा, संस्कार आणि जीवनमूल्यांनी परिपूर्ण अशी जीवनशैली आहे. पूर्वांचलला स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे ‘वीरांची भूमी’ म्हणून ओळख मिळाली आहे.

प्राचीन काळापासून वैदिक, बौद्ध आणि मुस्लिम शिक्षणाचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणूनही पूर्वांचलची ओळख आहे. बनारस हिंदू विद्यापीठ आणि अलाहाबाद विद्यापीठासारख्या नामांकित शैक्षणिक संस्थांनी आधुनिक भारताच्या जडणघडणीत आणि बौद्धिक विकासात मोठे योगदान दिले आहे.

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्यातील दि. 1 एप्रिल 20219 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर,हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यास 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ..

दहा डिसेंबर सकाळी एक वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मेगा ब्लॉक-मध्य रेल्वेने कल्याण आणि लोणावळा स्थानकांदरम्यान आवश्यक पायाभूत सुविधांच्या दुरुस्ती आणि जतनासाठी एक विशेष अभियांत्रिकी ब्लॉक जाहीर

vishwatmaklokswamivarta

१०० दिवसांच्या सुधारणा मोहिमेत गडचिरोलीच्या सामाजिक न्याय विभाग राज्यात तिसरा

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,तीन दिवसीय विदर्भ पाणी परिषदेस प्रारंभ   बळीराजा योजना अंतर्गत 20 हजार गावांचे बदलले चित्रतापी पुनर्भरण व वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प देईल शेतीला शाश्वत पाणी..

दिनांक 25 जानेवारी, 2025‘राष्ट्रीय मतदार दिवस’ : मतदार जागृती..

vishwatmaklokswamivarta

चाकण एमआयडीसीतील रस्ते व पायाभूत सुविधांची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी रस्ते, वाहतूक, पावसाच्या पाण्याचा निचरा, अतिक्रमणे व पार्किंगच्या प्रश्नांचा घेतला आढावा; कालबद्ध उपाययोजनांच्या सूचना