*पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या 81 वा वर्धापनदिन सोहळा* *राज्यपालांच्या हस्ते अनेक मान्यवरांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराचे वितरण होणार*
मुंबई प्रतिनिधी – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीचा 81वा वर्धापन दिन सोहळा उद्या दि. 8 जुलै रोजी मुंबईत, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.
पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या 81 व्या वर्धापन दिनानिमीत्त आयोजित सोहळयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार वितरण अनेक मान्यवरांना करण्यात येणार आहे. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या 81व्या वर्धापन दिन सोहळयास महाराष्ट्राचे राज्यपाल मा. जिष्णु देव वर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्यासोबत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महाराष्ट विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, खासदार उज्वल निकम, पदमश्री अशोक खाडे, यांच्यासह अनेक मान्यंवर या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे भूषविणार आहेत.
पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने विविध मान्यवरांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने दरवर्षी गौरविण्यात येते. यंदा सुध्दा पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या 81व्या वर्धापनदिना निमीत्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवॉर्ड 2026 च्या पुरस्काराने महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महाराष्ट विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, आमदार निलमताई गो-हे, शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, मुंबई विद्यापीठाचे रजिस्ट्रार प्रसाद कारंडे, विद्या विकास एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी डॉ. विनय राऊत, सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. रमेश खानविलकर, सिध्दार्थ कॉलेज ऑफ आर्ट, कॉमर्स, सायन्सचे प्रिन्सीपल अशोक सुनतकरी, छत्रपती संभाजीनगर मधील एज्युकेशन कॉलेजचे प्रिन्सीपल डॉ. शिवाजी सुर्यवंशी ; सिध्दार्थ नाईट हायस्कुलचे प्रिंसीपल श्री. विजय मोहिते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालवाडी कोल्हापुरचे नंदकुमार गोंधळी, के जे सोमय्या कॉलेजचे आर्ट आणि कॉमर्सचे प्रिन्सीपल डॉ. किशन पवार, एनसीआरटीसी टाझा स्कुलचे सीईओ जयरामण सुब्रहमण्यम, पद्मश्री अशोक आबा खाडे, डॉ. विजय मोरे, एसएनईसी युनिव्हर्सीटीचे बोर्ड मेंबर डॉ. अखील शहानी, मिलींद कॉलेज ऑफ आर्ट संभाजीनगरचे वैशाली प्रधान, सिध्दार्थ कॉलेज ऑफ समावेशचे डॉ.विष्णु भंडारी, या मान्यवरांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने राज्यपाल महामहिम जिष्णु देव वर्मा यांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे अशी माहिती पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. lरामदास आठवले यांनी दिली आहे. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या 81 व्या वर्धापन दिनानिमीत्त आयोजित सोहळयास मुंबईतील सर्व आंबेडकरी जनतेने व रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहुन शोभा वाढविण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ कासारे यांनी केले आहे. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापन दिन सोहळयाचे नियोजन पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी डॉ. वासुदेव गाडे, विश्वस्तॲड.बी.के. बर्वे, कार्यकारी सदस्य चंद्रशेखर कांबळे यांनी केले आहे .