vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

समूह साधन केंद्र समन्वयक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा संदर्भात शुद्धीपत्रक जारी…

समूह साधन केंद्र समन्वयक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा संदर्भात शुद्धीपत्रक जारी…

बुलडाणा, प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा–2025 या परीक्षेचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने 1 ते 5 डिसेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे.

समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेबाबतची अधिसूचना, वेळापत्रक व ऑनलाईन आवेदनपत्राबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

नवीन शुद्धीपत्रकानुसार, अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची बी.ए., बी.कॉम. किंवा बी.एस.सी. ही पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तसेच शासन निर्णय दिनांक 29 ऑगस्ट 2025 नुसार 1 जानेवारी 2025 रोजी अखंड नियमित सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येईल. याशिवाय, जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्षांची अखंडित सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. शिक्षण सेवक पदावरील सेवा यासाठी ग्राह्य धरली जाणार आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त कैलास दातखीळ यांनी कळविले आहे.

000000

संबंधित पोस्ट

पीडित कुटुंबांना मिळाला शासकीय सेवेचा आधार जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते 8 वारसांना नियुक्तीपत्रे प्रदान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणीदुसरी यादी 15 ऑगस्टपूर्वी प्रसिद्ध होण्याची शक्यता- जिल्हाधिकारी संतोष पाटील

कोल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या मुजुमदार पार्क सोसायटीतील प्रथम वर्षीय सार्वजनिक गणेशोत्सव धुमधडाक्यात…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्यास ११ सप्टेंबरपर्यंत मुदत

vishwatmaklokswamivarta

कृषी महोत्सवातून होणार तंत्रज्ञानाची देवाण – घेवाणशहरातील आझाद मैदानावर महोत्सवाचे आयोजन

तंत्रज्ञान क्षेत्रात विदर्भ पुढे जाण्यासाठी कॉम्पेक्स प्रदर्शन महत्वाचे ठरेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॉम्पेक्स-2025 प्रदर्शनास मुख्यमंत्र्यांची भेट,नागपूर एआयचे महत्वाचे केंद्र ठरेल  राज्यात इनोव्हेशन सिटी तयार होत आहे

vishwatmaklokswamivarta