vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रेवदंडा-साळाव पुलावरून २० टनांवरील अवजड वाहतुकीस बंदी-पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांचे आदेश अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

रेवदंडा-साळाव पुलावरून २० टनांवरील अवजड वाहतुकीस बंदी-पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांचे आदेश अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी : अलिबाग तालुक्यातील रेवदंडा-साळाव पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुलावरून २० टनांवरील अवजड वाहतुकीस दिवसा व रात्री पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली असून, ही वाहतूक बंदी अधिसूचनेच्या दिनांकापासून पुढील आदेश होईपर्यंत लागू राहणार आहे.

रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेला साळाव पूल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक स्थितीत असल्याने पुलाच्या संरचनात्मक बळकटीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. यापूर्वी पुलावरून १२ टनांवरील अवजड वाहतुकीस बंदी घालण्यात आली होती. सद्यस्थितीत संबंधित कंत्राटदारामार्फत पुलाच्या संरचनात्मक दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून, पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने २० टनांवरील जड व अवजड वाहतूक बंद ठेवण्याची आवश्यकता असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविले आहे.

संबंधित कंत्राटदाराने पुलावरून वाहतुकीसाठी काही महत्त्वपूर्ण अटी व निर्बंध सुचविले आहेत. त्यानुसार पुलावर वाहनांची कमाल वेगमर्यादा ताशी ३० किलोमीटर ठेवणे, कोणत्याही परिस्थितीत वाहतूक कोंडी होऊ न देणे तसेच दोन वाहनांमध्ये किमान २० मीटरचे अंतर ठेवणे आवश्यक आहे.

पुलावरून होणाऱ्या अति अवजड वाहतुकीमुळे पुलास क्षती पोहोचून संभाव्य दुर्घटना घडू नये, तसेच नागरिकांच्या जीवित व मालमत्तेची सुरक्षितता अबाधित राहावी, या उद्देशाने जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी २० टनांवरील अवजड वाहनांसाठी वाहतूक बंदीचे आदेश जारी केले आहेत.अलिबागकडून मुरूडकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग अलिबागकडून मुरूड-साळावकडे जाणाऱ्या अवजड वाहनांनी अलिबाग-पोयनाड-वडखळ-नागोठणे-कोलाड-रोहा-तळेखार-साळाव या मार्गाचा वापर करावा. तसेच अलिबाग-पेझारी चेकपोस्ट-नागोठणे-कोलाड-रोहा-तळेखार-साळाव या पर्यायी मार्गाचाही वापर करता येईल. याशिवाय अलिबाग-बेलकडे-वावे-सुडकोली-रोहा-तळेखार-साळाव हा मार्गही वाहतुकीसाठी उपलब्ध राहणार आहे.

मुरूडकडून अलिबागकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग,मुरूडकडून अलिबागकडे येणाऱ्या अवजड वाहनांनी मुरूड-साळाव-तळेखार-चणेरा-रोहा-कोलाड-नागोठणे-वडखळ-पोयनाड-अलिबाग या मार्गाचा वापर करावा. तसेच मुरूड-साळाव-तळेखार-रोहा-कोलाड-नागोठणे-पेझारी चेकपोस्ट-अलिबाग हा पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. याशिवाय मुरूड-साळाव-तळेखार-रोहा-सुडकोली-वावे-बेलकडे-अलिबाग या मार्गानेही अवजड वाहतूक वळविण्यात आली आहे.ही वाहतूक बंदी दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला, पाणी आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही.रेवदंडा-साळाव पुलाची सुरक्षितता, संभाव्य दुर्घटना टाळणे आणि वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने वाहनचालक व वाहतूकदारांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

संबंधित पोस्ट

आदिवासी सुशिक्षित उमेदवारांना विनामुल्य स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण

वाचनाने जीवनाकडे पाहण्याच्या नवदृष्टीचा विकास   – जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर,‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमाने जिल्ह्यातील ग्रंथालयांमध्ये नववर्षाचे स्वागत! 

गडचिरोलीचे स्वतंत्र व्हिजन ठरवा; राष्ट्रीय सरासरीपेक्षा पुढे जाण्याचे लक्ष्य ठेवा”*सहसचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांचेकडून प्रधानमंत्री धनधान्य किसान योजनेचा आढावा*

vishwatmaklokswamivarta

नमो शेतकरी महासन्‍मान निधी योजनाचा थकित निधी शेतक-याच्‍या खात्‍यावर जमा करून नमो शेतकरी महासन्‍मान योजना पूर्ववत चालू करा… बाबासाहेब कोलते

उच्च न्यायालयात सिंहगडएक्स्प्रेसच्या थांब्यासाठी-अशी मागणी पुणे प्रवासी संघाने केली

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित; पुढील अधिवेशन २२ जून रोजी मुंबईत