सेवा संकल्प अभियानांतर्गत धनगरवाडी शाळेत वृक्षारोपण-विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश
जालना प्रतिनिधी: सावरगाव हडप, सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी, केंद्र सावरगाव येथे ‘वृक्षारोपण अभियान’ उत्साहात राबविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन तसेच वृक्षांच्या संगोपनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात डॉ. भरत वानखेडे, विस्तार अधिकारी (शिक्षण) तसेच केंद्रप्रमुख विकास बनकर, केंद्र सावरगाव हडप यांच्या उपस्थितीत शाळा परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणानंतर लावलेल्या रोपांचे नियमित संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करून ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’ हा संदेश देण्यात आला.