vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बॉलीवूड विनोदी अभिनेता मुस्ताक खान यांचे मुंबईतील नानावटी रुग्णालयात निधन

बॉलीवूड विनोदी अभिनेता मुस्ताक खान यांचे मुंबईतील नानावटी रुग्णालयात निधन

 बॉलीवूड प्रतिनिधी.-वेलकम, आशिकी चित्रपट अभिनेत्याचे निधन… कॅन्सरशी झुंज अपयशी…अभिनेते मुश्ताक खान यांचे आज वयाच्या 56 व्या वर्षी दुःखद निधन झाले. मुश्ताक खान हे कॅन्सरच्या गंभीर आजाराशी तोंड देत होते मात्र आज त्यांची ही झुंज अयशस्वी ठरली.

मुश्ताक खान यांनी वेलकम चित्रपटात छोटीशी पण तेवढीच स्मरणीय भूमिका निभावली होती. मालिका चित्रपटात ते विनोदी तसेच सहाय्यक भूमिकेत वावरले. गेली अनेक दशक त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आज त्यांच्या निधनाच्या बातमीने हिंदी सृष्टीत मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुश्ताक खान गेल्या जवळपास १५ दिवसांपासून मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल होते. ते कर्करोगाशी झुंज देत होते. सुमारे पाच वर्षांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. मात्र, अलीकडेच हा आजार पुन्हा बळावला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली. मुश्ताक खान यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. मुश्ताक खान यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत प्रामुख्याने सहाय्यक आणि विनोदी भूमिका साकारून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘वेलकम’ चित्रपटातील त्यांचा अंदाज प्रेक्षकांना विशेष आवडला होता. याशिवाय ‘आशिकी’, ‘मुझसे शादी करोगे’ आणि ‘हम हैं राही प्यार के’ यांसारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली.

संबंधित पोस्ट

धारावीतील धडाडीच्या महिला कार्यकर्त्या श्रीमती अनिताताई डोईफोडे यांची भारतीय जनता पार्टी च्या महिला मोर्चा मुंबई सचिव पदी नियुक्ती

शहरातील विकासकामे पूर्ण करताना उपयुक्ततेवर भर द्यावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअमरावती महानगरपालिकेच्या विविध प्रश्नांबाबत आढावा..

vishwatmaklokswamivarta

एकल प्‍लास्‍टीक यापुढे शहरात नियमितपणे कार्यवाही करण्‍यावर भर – अतिरिक्‍त आयुक्‍त श्री. अर्जुन गिराम.

vishwatmaklokswamivarta

दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक शस्त्रांचे भव्य प्रदर्शन!**‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त होणार ‘शौर्याचा शंखनाद’!*

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय #क्रीडा दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात दिली. तसेच, जिल्ह्यात आधुनिक क्रीडा संकुल उभारणार असल्याची घोषणाही- मंत्री आशिष शेलार

माऊली’ संगीतमय नाट्यप्रयोगातून संत ज्ञानेश्वरांच्याजीवनचरित्राचा दिव्य आविष्कार,ज्ञानेश्वर माऊलींच्या 750 व्या जयंती वर्षानिमित्त,भक्ती, अध्यात्म आणि संस्कृतीचा सुरेल संगम