vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांनी भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियानाचा लाभ घ्यावा  

विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांनी भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियानाचा लाभ घ्यावा

सातारा, प्रतिनिधी :- राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या अभियानांतर्गत राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांना शासनाच्या विविध योजना, आवश्यक ओळखपत्रे व प्रमाणपत्रांचा लाभ सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान ही विशेष मोहिम दि. २७, २८ व २९ सप्टेंबर २०२६ रोजी राबविण्यात येत आहेत व त्यानंतरचे नियमित अभियान प्रत्येक तिमाहीच्या पहिल्या मंगळवारी घेण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांसाठी मंडळ व तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांची भटकंतीची जीवनशैली लक्षात घेऊन शासनाच्या विविध योजना तसेच मूलभूत हक्कांशी संबंधित आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. तरी सातारा जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या पात्र नागरिकांनी संबंधित तालुका व मंडळस्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष शिबिरांच्या ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे आणि शासनाच्या विविध योजना, सेवा व प्रमाणपत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

कॅपिटल मार्केट’मधून निधी उभारणारी-पिंपरी-चिंचवड ही देशातील पहिली महानगरपालिका- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी – चिंचवड महानगरपालिका हरित कर्जरोखे मुंबई शेअर बाजारात लिस्टिंग कार्यक्रम

सायन पनवेल महामार्गावर सखोल स्वच्छता मोहीम – शहराच्या अंतर्गत भागातही मुख्य रस्त्यांची सखोल स्वच्छता..

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने व्याख्यानांतून गुरु-शिष्य परंपरेविषयी प्रबोधन-मुंबईतील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

अग्रवाल युवा मंचची नुतन कार्यकारिणी जाहीर…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद कृषि विभाग स्वीय निधी योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नागरिकांना जलद सेवा पोहोचवण्यासाठी शासकीय सेवा ऑनलाईन देऊन नागरिकांचे जीवन सुखकर करा-महा आयटी कॉर्पोरेशन मुंबई चे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर