vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षणाला डॉ.पी.पी.डोके यांची भेट देऊन पडताळणी.

सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षणाला डॉ.पी.पी.डोके यांची भेट देऊन पडताळणी.

 

जालना, प्रतिनिधी: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्रांचे बळकटीकरण व ग्रामीण जनतेपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (Comprehensive Primary Health Care) प्रशिक्षणाचे दोन दिवसीय आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र वरुड (बु) येथे करण्यांत आले होते. सदरील प्रशिक्षणाला माजी संचालक डॉ. पी.पी.डोके यांनी भेट देऊन प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त करुन सदरील प्रशिक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.                                                                                                                         या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आरोग्य कर्मचाऱ्यांची क्षमता वृध्दींगत व कौशल्यपुर्ण करुन नागरिकांना प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक, उपचारात्मक व पुनर्वसनात्मक अशा सर्वसमावेशक आरोग्य सेवा प्रभावीपणे उपलब्ध करुन देणे हा आहे. या प्रशिक्षणामध्ये विविध स्किलद्वारे सैध्दांतिक व प्रात्यक्षिक स्वरुपात प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये १३ प्रकारच्या सेवा बाबत प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये गरोदरपणा, प्रसुती व प्रसुतीपश्चात काळजी, नवजात शिशु व अर्भक, बालक व किशोरवयीन, कुटूंब कल्याण व प्रजनन आरोग्य सेवा, संसर्गजन्य रोग प्रतिबंध व नियंत्रण, असंसर्गजन्य रोगांची माहिती व व्यवस्थापन (उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग) नेत्र, कान नाक घसा, मौखिक, मानसिक आरोग्य, वृध्दांची काळजी व उपशामक वेदना व्यवस्थापन, आपत्कालीन वैद्यकीय सेवा व प्रथमोपचार, आरोग्य संवर्धन, योग व जनजागृती इ.बाबत आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी, व आशा कार्यकर्ती यांना सविस्तर प्रशिक्षण व मार्गदर्शन या प्रशिक्षणांच्या माध्यमातुन देण्यात आले.

जिल्हा परिषदेची साथ व आरोग्य कर्मचाऱ्यांची मेहनत यांच्या बळावर जालना जिल्हा आरोग्य संपन्न बनविण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणुन डॉ. अश्वमेध जगताप, डॉ. बेबीसरोज घोलप (स्त्री रोग), डॉ. प्रज्ञा कुलकर्णी (स्त्री रोग), डॉ. प्रशांत बांदल (भिषक), डॉ. बेरकर (बालरोग), श्री. भुतेकर ए.डी., संतोष जाधव, मच्छिंद्र बदर, उर्मिला वळसे, संगिता पाखरे, जनाबाई जगताप यांनी सहकार्य केले.

-*-*-*-*-*-*-

 

संबंधित पोस्ट

सार्वजनिक आरोग्य विभाग‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद* १ कोटीहून अधिक नागरिक लाभार्थी*७५ लाख ८७ हजार पेक्षा जास्त महिलांची तपासणी..

नाशिक जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ५० हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा आणि गर्भपात कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस आणि आरोग्य विभागाने कार्यप्रणाली तयार करावी- डॉ. नीलम गोऱ्हे

जिल्हा कारागृहात आरोग्य शिबीर संपन्न

आयुष्यमान व वय वंदना कार्ड ई-केवायसी मोहिम प्रभावीपणे राबवा; सर्व विभागाने समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन* २० मे ते ३० जून २०२६ या कालावधीत विशेष मोहीम..

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात पाय बसविण्यासाठी शिबीरांचे आयोजन