vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गणेश विसर्जनासाठी जालन्यात वाहतूक मार्गात बदल,25 सप्टेंबर रोजी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलिस अधीक्षकांचे आदेश…

गणेश विसर्जनासाठी जालन्यात वाहतूक मार्गात बदल,25 सप्टेंबर रोजी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलिस अधीक्षकांचे आदेश…

   जालना, प्रतिनिधी : गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरात दि. 25 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणूक पारंपरिक मार्गाने काढण्यात येणार आहे. या काळात मिरवणुकीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, रस्ता मोकळा राहावा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शहरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. याबाबत पोलिस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 च्या कलम 36 अन्वये आदेश जारी केला आहे.

आदेशानुसार, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा–टांगा स्टँड–सराफा बाजार–पाणीवेस–सुभाष चौक या मार्गावरून जुन्या जालन्याकडे जाणारी वाहतूक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, ओम हॉस्पिटल, मंगल बाजार, चमन बाजार, राजमहल टॉकीजजवळील पुलावरून ग्लोबल गुरुकुल शाळेजवळून बायपास रोडने अंबड चौफुली, नूतन वसाहत मार्गे वळविण्यात येणार आहे.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा–बडीसडक–सराफा बाजार–जवाहर बाग चौकी–रहेमान गंज मार्गे जुना मोंढा या मार्गावरील वाहतूक शिवाजी महाराज पुतळा, जिजामाता प्रवेशद्वार, जेईएस कॉलेज, बाबुराव काळे चौक, रहेमान गंज मार्गे वळविण्यात येणार आहे.

नवीन जालना–सदर बाजार परिसर–रहेमान गंज–मुर्गी तलाव परिसर–जवाहर बाग चौकी परिसरातील वाहतूक मामा चौक व सुभाष चौक मार्गे जुन्या जालन्याकडे जाण्यासाठी जुना मोंढा कमान, दीपक वाईन शॉप, बसस्थानक, लक्कड कोट, शिशटेकडी मार्गे वळविण्यात येणार आहे.

बसस्थानकाकडून येणारी वाहतूक सुभाष चौक, पाणीवेस मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे जाताना बसस्थानक, दीपक वाईन शॉप, जुना मोंढा कमान, मुरगी तलाव, बाबुराव काळे चौक, जेईएस कॉलेज, जिजामाता प्रवेशद्वार मार्गे वळविण्यात येणार आहे.

रेल्वे स्टेशनकडून मंमादेवी मार्गे गांधी चमन व मंमादेवी मार्गे नवीन जालन्यात जाणारी वाहतूक नूतन वसाहत, अंबड चौफुली व मंठा चौफुली मार्गे वळविण्यात येणार आहे.

याशिवाय छत्रपती संभाजीनगरकडून जालना मोतीबाग मार्गे अंबड, रेवगाव, घनसावंगी, मंठा, सिंदखेडराजाकडे जाणारी वाहतूक ग्रेडर टी पॉइंट, राजूर चौफुली, नवीन मोंढा, कन्हैया नगर मार्गे बायपास रोडने वळविण्यात येणार आहे.गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी पोलिस प्रशासनाने दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करावे. वरील आदेश दि. 25 सप्टेंबर, 2026 रोजी सकाळी 7 वाजेपासुन श्रीगणेश विसर्जन होईपर्यंत अंमलात राहिल असे आवाहन करण्यात आले आहे ***

घाणेवाडी तलाव परिसरात 200 मीटर प्रतिबंधात्मक आदेश

जालना : आगामी श्री गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील घाणेवाडी तलाव परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

श्री गणेश विसर्जन 25 सप्टेंबर 2026 रोजी असल्याने काही गणेश मंडळांकडून घाणेवाडी तलावात गणेशमूर्ती विसर्जनासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच घाणेवाडी तलावातून जालना शहराला पाणीपुरवठा होत असल्याने तेथे श्री गणेशमूर्ती विसर्जन केल्यास संबंधित ग्रामस्थांकडून विरोध होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर घाणेवाडी तलावाच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, जालना यांनी ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना माहिती देऊन करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

हा आदेश 25 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून 26 सप्टेंबर 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे जालना जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविणार – महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षण कार्यकाळ 6 ऐवजी आता 11 माहिने…

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाराष्ट्र विधानमंडळातर्फे 8 जुलै रोजी सत्कार;”भारताची राज्यघटना” विषयावर संबोधन..

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ• रस्ता सुरक्षा जनजागृती रॅलीस हिरवी झेंडी दाखवून केले मार्गस्थ 

वारकऱ्यांच्या सुरक्षितता, सुविधांना प्राधान्य देऊन समन्वयाने नियोजन करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

आगामी निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी-संगठन मजबूत करावे – भास्कर (आबा) दानवे,जालना शहरातील संग्राम नगर येथे भाजयुमो चे शाखा उदघाटन

vishwatmaklokswamivarta