vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पोषण माह २०२६ तसेच सेवा संकल्प अभियान अंतर्गत मुरबाड येथे बाल संरक्षण समितीबाबत प्रशिक्षण-बालकांचे हक्क, बाल विवाह प्रतिबंध व संरक्षणाबाबत अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन

पोषण माह २०२६ तसेच सेवा संकल्प अभियान अंतर्गत मुरबाड येथे बाल संरक्षण समितीबाबत प्रशिक्षण-बालकांचे हक्क, बाल विवाह प्रतिबंध व संरक्षणाबाबत अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन

ठाणे, प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे) : पोषण माह २०२६ तसेच सेवा संकल्प अभियान अंतर्गत “समुदाय सहभाग, स्वामित्व व उत्तरदायित्व” या संकल्पनेनुसार पंचायत समिती मुरबाड येथील शांताराम भाऊ घोलप सभागृहात अंगणवाडी सेविकांसाठी बाल संरक्षण समिती संदर्भात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कमिटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट (CCDT), मुंबई आणि महिला व बाल विकास विभाग, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.यावेळी CCDT संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर रामेश्वर भाले यांनी बालकांचे हक्क व अधिकार, बाल संरक्षण तसेच बालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन केले. बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर समुदायाचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.प्रशिक्षणामध्ये बाल संरक्षण समितीची नव्याने स्थापना, समितीमध्ये किमान ९ आणि कमाल ११ सदस्य असणे, तसेच समितीच्या माध्यमातून बालकांच्या संरक्षणासाठी प्रभावीपणे कार्य करण्याबाबत माहिती देण्यात आली. त्याचबरोबर बाल विवाह प्रतिबंधासाठी ग्रामपंचायत स्तरावर सभा घेऊन जनजागृती करणे, बाल विवाह रोखण्यासाठी समुदायाने सतर्क राहणे आणि बाल विवाहाची माहिती मिळाल्यास तात्काळ चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८ वर संपर्क साधणे, याबाबतही अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी CDPO मुरबाड-१ तारमळे, CDPO मुरबाड-२ अपर्णा भोईर, CCDT संस्थेचे समन्वयक वैभव गायकवाड, पूजा ढमके, बाल संरक्षण अधिकारी दीपक गाडेकर, चाइल्डलाइन स्टाफ स्विटी जोसेफ व रोहिणी चौधरी यांची उपस्थिती होती.कार्यक्रमादरम्यान पोषण पाककृती, रानभाज्यांचे महत्त्व आणि संतुलित आहाराचे महत्त्व याबाबतही माहिती देण्यात आली. शेवटी उपस्थितांनी पोषण प्रतिज्ञा तसेच बाल विवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेऊन बालकांच्या संरक्षणासाठी आणि कुपोषणमुक्त समाज निर्मितीसाठी सामूहिक सहभागाची बांधिलकी व्यक्त केली.
०००

संबंधित पोस्ट

वारणा धरणात 23.03 टी.एम.सी. पाणीसाठा

पुनर्वसनाच्या ठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्या- सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत‍ छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले…

वेव्हज 2025- भारत सरकारच्या वतीने आयोजित पहिली जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद

मुंबई ‘क्रिएटिव्ह इकॉनॉमी’चे जागतिक केंद्र होणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुंबईत ‘आयआयसीटी’ चा शुभारंभ; क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात नवे पर्व– केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

चिखली चे गट शिक्षण अधिकारी विरुद्ध कारवाई न झाल्याने दुसऱ्या दिवशी उपोषण सुरु शिक्षणाधिकारी प्राथमिक हेच पाठीशी घालत आहे

भाजपा जिल्हा कार्यालयात माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व लोकनेते रावसाहेब पाटील दानवे दादा यांच्या शुभहस्ते श्री गणेशाची आरती मंगलमय वातावरणात संपन्न

vishwatmaklokswamivarta