vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हातकातरो खांब’ संरक्षित स्मारके घोषित केल्याबद्दल गोवा सरकारचे अभिनंदन !* – हिंदु जनजागृती समिती

‘हातकातरो खांब’ संरक्षित स्मारके घोषित केल्याबद्दल गोवा सरकारचे अभिनंदन !* – हिंदु जनजागृती समिती

 

राज्य प्रतिनिधी- गोवा सरकारने ‘गोवा प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायदा, १९७८’ अंतर्गत जुने गोवे येथील ऐतिहासिक ‘हातकातरो खांब’ आणि फोंडा येथील ‘मर्दनगड’ या वास्तूंना अधिसूचना काढून संरक्षित स्थळांचा दर्जा दिला आहे. हिंदूंच्या अनेक वर्षांच्या मागणीला मिळालेल्या या यशाचे हिंदु जनजागृती समिती राष्ट्रीय स्तरावरून स्वागत करत असून या ऐतिहासिक निर्णयाबद्दल गोवा सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन करत आहे, अशी माहिती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी दिली.

 जुलमी पोर्तुगीज राजवटीत आणि ‘इन्क्विझिशन’च्या काळ्याकुट्ट काळात गोमंतकीय हिंदूंवर जे अनन्वित अत्याचार झाले आणि त्यांना ज्या अमानुष शिक्षा दिल्या गेल्या, त्याचे ‘हातकातरो खांब’ हे एकमेव जिवंत आणि प्रातिनिधिक प्रतीक आहे. धर्मासाठी प्राणांतिक यातना सहन करणाऱ्या त्या स्वाभिमानी हिंदूंच्या बलिदानाचे स्मरण भावी पिढ्यांना रहावे, यासाठी या ‘हातकातरो खांबा’चे ऐतिहासिक वारसा म्हणून जतन होणे अत्यंत आवश्यक होते. यासाठी हिंदु जनजागृती समितीने गेल्या अनेक वर्षांपासून मोठा लढा उभारला. समितीने यासाठी असंख्य निवेदने दिली, आंदोलने केली, पत्रकार परिषदा घेतल्या आणि ‘गोवा क्रांतीदिनी’ हुतात्म्यांना श्रद्धांजली वहात या विषयाकडे सरकार व इतिहासप्रेमींचे लक्ष वेधले होते. अखेर समितीच्या आणि हिंदू संघटनांच्या या प्रदीर्घ लढ्याला मोठे यश आले आहे.

 याचबरोबर फोंडा येथील ‘मर्दनगड’ हा छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेला गोव्यातील एकमेव किल्ला असून तो महाराजांचे शौर्य आणि धैर्य यांचे महान प्रतीक आहे. या ऐतिहासिक ठेव्याचे संवर्धन होऊन तो भावी पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी ‘मर्दनगड संवर्धन समिती’ने पुढाकार घेतला होता, ज्यामध्ये हिंदु जनजागृती समितीही सक्रिय सहभागी होती. मर्दनगडाला संरक्षित स्मारक घोषित करणे, हे गोमंतकातील हिंदु संघटना आणि इतिहासप्रेमींनी उभारलेल्या मोहिमेचेच मोठे यश आहे.

 सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर आता ‘हातकातरो खांब’ आणि ‘मर्दनगड किल्ला’ यांचा खरा इतिहास दर्शवणारे माहिती फलक त्या परिसरात तात्काळ लावावेत, अशी मागणी समितीने केली आहे. तसेच या दोन्ही स्मारकांचा धगधगता इतिहास शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करावा आणि गोव्यातील सर्व गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी गोवा सरकारने तातडीने स्वतंत्र ‘गड-दुर्ग संवर्धन प्राधिकरण’ स्थापन करावे, अशी आग्रही मागणीही हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी या पत्रकाद्वारे केली आहे.*श्री. रमेश शिंदे,*राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती संपर्क : ९९८७९ ६६६६६)

संबंधित पोस्ट

मूल्याधिष्ठित पत्रकारिता देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वन पर्यटनासाठी पाच वनसफारी गाड्या व पोलिसांच्या ६३ दुचाकी वाहनांचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण जळगाव जिल्ह्यात वन्यजीव पर्यटन व पोलीस आधुनिकीकरणाला गती

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्याच्या जडणघडणीत क्रांतिवीर किसन वीर यांचा मोलाचा वाटा – पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

राज्यासह मुंबई, ठाण्यात गुढीपाडवा शोभा यात्रेला दिमाखात सुरुवात

ऑपरेशन प्रहारः अवैध मद्यविक्री प्रकरणी १२२ ढाबाचालक दोषी, लोकअदालतीत २६ खटल्यात ८ लाखांचा दंड वसूल…

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण