vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ऑपरेशन प्रहारः अवैध मद्यविक्री प्रकरणी १२२ ढाबाचालक दोषी, लोकअदालतीत २६ खटल्यात ८ लाखांचा दंड वसूल…

ऑपरेशन प्रहारः अवैध मद्यविक्री प्रकरणी १२२ ढाबाचालक दोषी, लोकअदालतीत २६ खटल्यात ८ लाखांचा दंड वसूल…

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- राज्य उत्पादन शुल्क विभागाने एप्रिल २०२५ पासून ऑपरेशन प्रहार राबविले आहे. त्याअंतर्गत एप्रिल ते ऑगस्ट या दरम्यान जिल्ह्यात अवैध मद्यविक्री व बेकायदा ढाबा चालकांविरुद्ध केलेल्या कारवाईत ४७५ गुन्हे दाखल केले. ८४४ आरोपींना अटक केली. २८ लाख ८ हजार ३८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नुकत्याच झालेल्या लोकअदालतीत २६ खटल्यांची सुनावणी झाली. १२२ आरोपी दोषी ठरले व त्यांच्याकडून ७ लाख ८१ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांनी दिली आहे.

अवैध मद्यविक्री आणि बेकायदा ढाब्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभाग एप्रिल २०१५ पासून ऑपरेशन प्रहार राबवित आहे. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ४७५ गुन्हे दाखल केले. ८४४ जणांना अटक करण्यात आली आणि २८ लाख ८ हजार ३८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हा विधी सेवा केंद्रामार्फत दि.१३ सप्टेंबर रोजी झालेल्या लोकअदालतीत महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ च्या कलम ६८ आणि ८४ अंतर्गत २६ खटल्यांचा निकाल लागला त्यात १२२ जणांवर दोष सिद्ध झाला. त्यांच्याकडून ७ लाख ८१ हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला.दोषसिद्धी मध्ये जिल्ह्याची ही आघाडी आहे.

परवानाधारक ठिकाणांव्यतिरिक्त अवैध मद्यविक्री, त्यास बेकायदा जागा पुरविणे, मद्यपान करणे अशा गैरप्रकारांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत कारवाई केली जाईल,असेही अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी कळविले आहे

संबंधित पोस्ट

बिनागुंडा परिसरात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची संयुक्त क्षेत्रभेट,जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्यानंतर बिनागुंडा परिसरात योजनांच्या अंमलबजावणीला गती वनपट्टेधारकांना फार्मर आयडी, घरकुल व विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन..

विदर्भ , मराठवाडा, तेलंगलना आणि आंध्रप्रदेश या ठिकाणांना एका सूत्रात बांधणाऱ्या तिरुपती -अकोला- तिरुपती या साप्ताहिक एक्सप्रेसचा शुभारंभ करण्यात आला आहे

डिजिटल जनगणना 2027′ च्या तयारीला वेग; जिल्हास्तरीय क्षेत्रीय प्रशिक्षण संपन्न-जनगणनेचे कार्य अचूकपणे पूर्ण करा- डॉ. प्रवीणकुमार देवरे

जालना शहर महानगरपालिका व पतंजली योग शिबीर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने योग प्राणायाम शिबीरास प्रारंभ०७ फेब्रुवारी पर्यंत राहणार शिबीराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून-रविवारी संयुक्त पुर्व परीक्षेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

रेल्वेच्या मालवाहतुकीत नवा इतिहास! इगतपुरी मालधक्क्यावरून ऑटोमोबाईल लोडिंगला प्रारंभ; मध्य रेल्वेची मोठी भरारी …