vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून-रविवारी संयुक्त पुर्व परीक्षेचे आयोजन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून-रविवारी संयुक्त पुर्व परीक्षेचे आयोजन

 

           जालना,  प्रतिनिधी:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पुर्व परीक्षा रविवार दि.2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत जालना येथील विविध 9 परीक्षा उपकेंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी दिली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पुर्व परीक्षेसाठी जालना जिल्हा केंद्रावर एकुण 2 हजार 767 उमेदवारांसाठी एकुण 3 समन्वय पथक, एक भरारी पथक, 9 उपकेंद्र प्रमुख, 38 पर्यवेक्षक, 134 समवेक्षक, 18 सहायक, 9 केअर टेकर व 69 वर्ग-4चे कर्मचारी असे एकुण 281 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मस्तगड येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना पत्र देण्यात आले आहे. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.*-*-*-*-

संबंधित पोस्ट

गोल्डमन सॅक्सच्या नव्या मुंबई कार्यालयाचे  मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन,तिसरी मुंबई आर्थिक विकासाचा नवा अध्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साजर्‍या होत असलेल्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्याला जागतिक पर्यटन हब बनविण्यासाठी कोयना- दौलत डोंगरी महोत्सवासारखे महोत्सव ही काळाची गरज- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

फनेल झोनमधील रखडलेल्या इमारतींचा लवकरच पुनर्विकास- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

खतांची आगाऊ बुकिंग आता एफएफएस प्रणालीद्वारे

बुलढाणा जिल्ह्यात ‘जिवंत सातबारा मोहीम’ वारसांना सातबारावर नोंदणी करण्याची संधी १ ते ३१ मार्चपर्यंत कालबध्द कार्यक्रम चिखली तहसीलचा उपक्रम जिल्हास्तरावर