vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

फनेल झोनमधील रखडलेल्या इमारतींचा लवकरच पुनर्विकास- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

फनेल झोनमधील रखडलेल्या इमारतींचा लवकरच पुनर्विकास- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, प्रतिनिधी: फनेल झोनमध्ये उड्डाण मर्यादा आणि विविध तांत्रिक कारणांमुळे या भागातील अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडलेला आहे. मुंबईतील विमानतळाच्या फनेल झोनमध्ये येणाऱ्या आणि अनेक वर्षांपासून रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकास लवकरच करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.सदस्य अमित साटम यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावेळी सदस्य वरुण सरदेसाई, मनीषा चौधरी यांनी चर्चेत सहभाग घेतला.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाच्या मालकीची हाय फ्रिक्वेन्सी कम्युनिकेशन यंत्रणा सध्या अंधेरी (पश्चिम) व दहिसर (पूर्व) येथे कार्यरत असून, त्या परिसरात इमारतींच्या उंचीवर निर्बंध असल्यामुळे नागरिकांच्या पुनर्विकास प्रकल्पांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. ही बाब लक्षात घेता, राज्य शासनाने रडार यंत्रणा स्थलांतर करण्यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. हे निर्बंध हटवण्यासाठी आणि पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे पत्राद्वारे विनंती केली आहे. फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासामधील अडथळे दूर करून लवकरच या इमारतींचा पुनर्विकास मार्गी लावण्यात येईल. राज्य शासनाने यासाठी हस्तांतरणीय विकास हक्क तसेच प्रीमियम दरात सवलत देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे.

****

संबंधित पोस्ट

जलसंधारणाच्या प्रकल्पांच्या कायमस्वरूपीदुरुस्ती व देखभालकरिता नवीन धोरण आणणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

वार्षिक सर्वसाधारण सभेस मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले मार्गदर्शन;*नाविण्यपूर्ण उपक्रमास प्रोत्साहन द्या- गुलाब खरात *• पर्यावरण दिनानिमित्त घेतली शपथ

रब्बी हंगाम 2025 पिकस्पर्धा; अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी 31 डिसेंबर अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापे येथे देशी वृक्षरोपांची लागवड

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली आरपीआय हीच आमची माय – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**देशभरातील दलितांच्या राजकीय चळवळीचे आरपीआय हेच मातृस्थान* 

vishwatmaklokswamivarta

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व शिक्षणाचा उत्सवजिल्हा परिषद शाळा अस्नोली येथे सोहळा उत्साहात पार..