vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कराड – चिपळूण वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपायोजना करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

कराड – चिपळूण वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपायोजना करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

 

राज्य प्रतिनिधी: कराड -चिपळूण दरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने उपायोजना करा. या मार्गात असलेली अतिक्रमणे काढून टाकण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

मुंबई येथून शासकीय निवास्थानाहून दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मंत्री श्री. देसाई बोलत होते. यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, पाटणचे उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे, पोलीस उपाधीक्षक विजय पाटील, राष्ट्रीय महामार्ग पुणेचे अधीक्षक अभियंता श्री. विभुते, तहसीलदार अनंत गुरव, राष्ट्रीय महामार्गच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक, यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कराड-चिपळूण महामार्गावरील राडा-रोडा प्राधान्याने काढावा, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या मार्गावरील वाहतुक सुरळीत व अपघात होणार नाहीत यासाठी प्राधान्याने खड्डे बुजवावेत. पावसामुळे महामार्गावर पाणी साठणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात. रस्त्या शेजारी साईड पट्ट्या खचल्या आहेत अशा ठिकाणी त्या भरुन घ्याव्यात. हे काम येत्या आठ दिवसात करावे, असे निर्देश देऊन प्रांत, तहसीलदार व पोलीस विभागातील अधिकाऱ्यांनी कराड-चिपळूण मार्गाची पाहणी करुन उपाययोजना सुचवाव्यात, असे निर्देश पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया स्किल्स हब उभारणीमुळे-शिक्षण-उद्योग सहकार्यास नवी दिशा मिळणार- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

vishwatmaklokswamivarta

पुरातत्व विभागाने प्राचीन मंदिरांच्या संवर्धनाचे काम वेळेत पूर्ण करावे – प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७

vishwatmaklokswamivarta

संक्रांतपर्वात बचतगटाच्या महिलांचे दानाचे वाण-सैनिक कल्याण निधीसाठी १० हजार रुपयांचे योगदान

vishwatmaklokswamivarta

टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन म्हणजे सलोखा, एकता, संस्कृती आणि विविधतेचा उत्सव- क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे मुंबई मॅरेथॉनचा रिंगिंग बेल कार्यक्रम संपन्न..

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा निवडणूक 2025-2026 करिता नियुक्त 6 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांकरिता 1 जानेवारीपासून प्रशिक्षण कार्यक्रम…

vishwatmaklokswamivarta

जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीएसओपीची प्रभावी अंमलबजाणी करावी- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

vishwatmaklokswamivarta