vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कुणकेश्वरमध्ये ‘ट्री ऑफ लाइफ’ हॉटेल उभारणार मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करार सिंधुदुर्गला जागतिक पर्यटन केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

कुणकेश्वरमध्ये ‘ट्री ऑफ लाइफ’ हॉटेल उभारणार मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करार

सिंधुदुर्गला जागतिक पर्यटन केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल..

मुंबई, प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील ‘कोकणची काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वर येथे ताज हॉटेल्सच्या ‘ट्री ऑफ लाइफ’ ब्रँडचे आलिशान हॉटेल उभारण्यासंदर्भात मंत्रालयात मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करार झाला. ५० खोल्यांचे हे हॉटेल अवघ्या २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
शिरोडा-वेळागरनंतर आता कुणकेश्वर येथेही ताज हॉटेल साकारत असल्यामुळे देवगडसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होऊन व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.
कोकणच्या निसर्गसौंदर्याला जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधांची जोड देत सिंधुदुर्गला देश-विदेशातील पर्यटकांचे प्रमुख पर्यटन केंद्र बनविण्याच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, ताज ग्रुपचे तन्वीर जाहीदी, दत्तात्रय हिरे व रोहन रानडे उपस्थित होते.
०००००

संबंधित पोस्ट

पहिल्या प्रकाश पर्वानिमित्त महाआरोग्य शिबिर; १ हजार १५७ नागरिकांना मोफत आरोग्यसेवा

vishwatmaklokswamivarta

रायगड जि.प, पं.समिती सदस्यासाठी अलिबाग येथे कार्यशाळेचे आयोजन

फळपीक विमा योजनेत सहभागासाठी ई-पीक पाहणी करण्याचे आवाहन

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक खर्चाची काटेकोरपणे तपासणी करा – जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया ,खर्च निरीक्षक व्ही. कुमार यांच्याकडून पूर्वतयारीचा आढावा ; दैनंदिन अहवाल वेळेत सादर करण्याचे निर्देश उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा ४० लाख रुपये ; सर्व पथकांच्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा

केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे – फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

इलेक्ट्रीक वाहन रॅलीतून केली जनजागृतीअर्थिक बचत व पर्यावरण संवर्धनासाठी अपारंपारिकऊर्जा वापरास चालना द्यावी- अपारंपारिक ऊर्जा मंत्री सावे

vishwatmaklokswamivarta