vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

विद्यार्थ्यांच्या हितासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेश सुरू करा – मंत्री पंकजा मुंडे

विद्यार्थ्यांच्या हितासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेश सुरू करा – मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, प्रतिनिधी : पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासकीय आणि खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांची केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करावी. व्यवस्थापन कोट्याच्या शुल्काबाबत शुल्क नियामक प्राधिकरणाकडून स्पष्टता मिळेपर्यंत प्रवेश प्रक्रिया थांबवू नये, असे निर्देश पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

पशुवैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेचा आढावा घेताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, खासगी महाविद्यालयांतील विद्यापीठ कोट्यासाठीचे मूळ शुल्क निश्चित आहे. या शुल्काचा उल्लेख करून माहितीपत्रिका तातडीने प्रसिद्ध करावी आणि विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवावेत. शुल्क नियामक प्राधिकरण व्यवस्थापन कोट्याचे अंतिम शुल्क निश्चित करेल. प्राधिकरणाचा निर्णय सर्व संबंधित महाविद्यालयांना लागू राहील, अशी स्पष्ट नोंद माहितीपत्रिकेत करावी. तसेच, प्रवेश प्रक्रियेतील विलंबामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे पत्रात नमूद करून प्राधिकरणाकडून तीन दिवसांत उत्तर मागवावे, असे निर्देशही मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

यावेळी आमदार विनय कोरे, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., पशुसंवर्धन आयुक्त किरण पाटील, सहसचिव नि. भा. मराळे यांच्यासह पशुसंवर्धन विभागातील अधिकारी उपस्थित होते.

 

०००००

संबंधित पोस्ट

महिलांच्या हक्काचा विरोध करणाऱ्यांना जनता माफ करत नाही!” – पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लोकसभेत स्पष्टोक्ती 

कृषी पुरस्कारासाठी ऑनलाईन सुविधा*शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आतापर्यंतजिल्ह्याचे योगदान सव्वा तीन कोटी रुपयांचे

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव काळात अन्न व औषध प्रशासनाची विशेष जनजागृती व अंमलबजावणी मोहीम

vishwatmaklokswamivarta

भिवंडी येथे घडलेल्या दुर्दैवी इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट,शासनाच्या वतीने दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केली

आदिवासी भागात पाणी पुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटीलअकोले तालुक्यातील प्रशासकीय आढावा बैठकीत विकासकामे, पाणीपुरवठा, प्रलंबित योजनांचा आढावा