vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेतील पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेतील पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

मुंबई प्रतिनिधी-भारत #निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेतील पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार #औरंगाबाद विभाग पदवीधर, #पुणे विभाग पदवीधर, #नागपूर विभाग पदवीधर, #अमरावती विभाग शिक्षक आणि पुणे विभाग शिक्षक या पाच मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी संपुष्टात येणार आहे.

या निवडणुकीसाठी २९ सप्टेंबर २०२६ रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर, अर्जांची छाननी ७ ऑक्टोबर, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर २०२६ आहे. मतदान २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत होईल. मतमोजणी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात येणार असून, निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्ण केली जाणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकांची घोषणा केल्यापासून संबंधित मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसह विधान परिषद निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहितेच्या तरतुदी लागू करण्याबाबत आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांमध्येही स्पष्टता देण्यात आली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

 

#ECI

संबंधित पोस्ट

रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तसेच दि. ६ व ७ जुलै रोजी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्याने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी-नाले, धबधबे व पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे.

नयना गुंडे यांनी विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्विकारला

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी समिती स्थापन करणार-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले पाऊल …प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधितांवर कारवाई

vishwatmaklokswamivarta

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार,स्वयम योजनेसाठी अर्ज करावेत

अमृत’तर्फे विश्वबंधुत्व पंधरवड्याचे आयोजन विविध संस्थांनी सहभागी व्हावे

vishwatmaklokswamivarta