vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार,स्वयम योजनेसाठी अर्ज करावेत

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार,स्वयम योजनेसाठी अर्ज करावेत

जालना, प्रतिनिधी:- इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी व वसतिगृह प्रवेशापासून वंचित असलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजनेसाठी अर्ज दि. 17 ऑगस्ट 2025 रोजीपर्यंत मागविण्यात आले आहे. तरी या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरू करण्यात आली आहे. यावर्षीची दि. 1 ऑगस्ट 2025 पासून वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज करावेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी दि. 1 ऑगस्ट 2025 ते 17 ऑगस्ट 2025 या कालावधीत बी.ए/बी.कॉम/बी.एस.सी. अशा बारावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए/एम.एस.सी/एम.कॉम असे पदवी नंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र परिवहन विभाग-  डेडलाईन संपली आता कारवाई सुरु, HSRP बद्दल RTO कडून पोलिसांकडून विशेष मोहीम..

कोल्हापूर भूमी अभिलेख झाले ‘हायटेक’-३ कोटी ६९ लाखांच्या आधुनिक यंत्रसामग्रीचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरण

vishwatmaklokswamivarta

दुर्गापूजेच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

गॅस वितरणातील त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील 

राज्य शासन दुष्काळग्रस्त भागाला पाणीदार करून सिंचन वाढवण्यासाठी कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगोला येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

मुंबई – पुणे एक्सप्रेसवे वरील वाहतूक सुरळीत सुरू महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची माहिती