जनसामान्यप्रेमी आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेबांच्या नेतृत्वातील जनता दरबारास ‘न भूतो न भविष्यती’ असा प्रतिसाद…
राज्य प्रतिनिधी
देशाचा कणा समजल्या जाणाऱ्या देशातील प्रत्येक नागरिकाला आज खूप साऱ्या अडचणींना तसेच न सुटणाऱ्या समस्यांना सामोरं जावं लागते. अशाच अडचणी व समस्या ह्या आपल्या रेणापूर तालुक्यातील नागरिकांना पण असतात. पण ह्या त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व त्यांच्या आवाज ऐकण्यासाठी कोणीतरी पुढे येणं खूप गरजेचं होतं.तेंव्हा आपल्या सर्वांसाठी एक भक्कम आवाज म्हणून सदैव आपल्यासाठी तत्पर असणारे आपले विकासमूर्ती आमदार श्री. रमेशअप्पा कराड यांनी प्रत्येक नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी ‘जनता दरबार’ भरविण्याची संकल्पना आखली.
त्याप्रमाणे काल दि. 5 ऑगस्ट रोजी हा भव्यदिव्य असा जनता दरबार ‘न भूतो न भविष्यती’ अशा नागरिकांच्या मोठ्या व अभूतपूर्व प्रतिसादाने पार पडला.
सकाळी 11 वाजता सुरू झालेला जनता दरबार सायंकाळी साडेसहा वाजता संपला तब्बल साडेसात तास अखंडपणे सुरू असलेल्या या जनता दरबारातून अनेकांचे प्रश्नमार्गी लागल्याने उपस्थित नागरिकांतून मोठे समाधान व्यक्त केले जात होते. पंधरा वर्षानंतर रमेशआप्पांच्या माध्यमातून जनतेतील आमदार बघायला मिळाला असल्याची अनेकांनी भावना व्यक्त केली तर लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या रेणापूर येथील बाजार समितीच्या परिसरात झालेल्या जनता दरबारची अनेकांनी आठवण केली.🙇🏻♂️
जनता दरबारमध्ये विविध गावातील नागरिकांनी शेतस्ते, घरकुल, समशानभूमी, शिव रस्त्यावरील अतिक्रमणे, शेतीतील वीजप्रश्न, कबाले, समाज मंदिर, बस सेवा सुरू करणे, निराधारच्या पगारी, राशन दुकानचे प्रश्न, आरोग्य विषयक तक्रारी, विविध गावातील अवैध दारू विक्री व इतर अवैधधंदे ग्रामसेवक तलाठी गावात येत नाहीत, यासह विविध प्रलंबित असलेल्या समस्या नागरिकांनी मुक्तपणे मांडल्या. ✌🏻विशेष म्हणजे या जनता दरबारामध्ये अनेक विचाराचे नागरिक, विविध संघटनेचे कार्यकर्ते, महिला, वृद्ध नागरिक यांनी आपल्या अडचणी निवेदनाद्वारे व्यक्त केल्या. त्याला चांगला प्रतिसाद देत आमदार साहेबांनी व्यवस्थित सर्वांच्या व्यथा एकुण घेऊन संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाब विचारून सर्वांच्या निवेदनावर लवकरात लवकर कार्यवाही व्हावी अशा सूचना केल्या.. 👏🏻एखादा लोकप्रतिनिधी कसा असावा? याच उत्तम उदाहरणं म्हणजे लोकनेतृत्व श्री. रमेशआप्पा कराड साहेब…
गेली 20 वर्षांपासून लातूर ग्रामीण मधील सर्वसामान्य नागरिकांसाठी सत्ता असो अथवा नसो कायम त्यांच्या अडचणीसाठी धाऊन येणारं व्यक्तिमत्व म्हणून आपली छाप आपल्या कर्तृत्वावर मिळवलेली आहे. 🔥👏🏻
नागरिकांच्या बहुतांश प्रश्न आणि समस्या ह्या त्याचवेळी ‘जनता दरबारात’ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोडविण्यात आल्या. त्यावेळी संबंधित नागरिकांच्या अक्षरशः डोळ्यात आनंदाश्रू तरंगत होते.🥹
त्यासोबतच उपस्थित नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक समस्येचा आढावा घेत, प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांचे हे प्रश्न जास्तीत-जास्त 1 महिन्यात मार्गी लावण्याचे निर्देश सन्माननीय श्री. रमेशअप्पा कराड साहेबांनी दिले आहेत. 😍
ह्या जनता दरबारामुळे असंख्य नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सुटणार असल्याने काल जनता दरबारात उपस्थित रेणापूर व रेणापूर तालुक्यातील प्रत्येक नागरिक हा सन्माननीय श्री. रमेशअप्पा कराड साहेबांचे मनस्वी आभार मानत, समाधान व आनंदाने बहरलेल मन घेऊन आपल्या घरी जात होता.❤️भारतीय जनता पार्टी रेनापुर तालुक्याच्या वतीने माननीय आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेब तसेच सर्व उपस्थित प्रशासकीय अधिकारी वर्ग व ह्या जनता दरबारास उपस्थित सर्वसामान्य जनतेचे खूप-खूप आभार. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले