vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

श्री गणेशा आरोग्याचा’ अंतर्गत जिल्ह्यात १ हजार ५७४ आरोग्य शिबिरे; ८९ हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी

श्री गणेशा आरोग्याचा’ अंतर्गत जिल्ह्यात १ हजार ५७४ आरोग्य शिबिरे; ८९ हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ५७४ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, त्याद्वारे ८९ हजार ८७९ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये ३४ हजार ८१३ पुरुष, ४१ हजार ५१० महिला आणि १३ हजार ५५६ बालकांचा समावेश आहे. यापैकी १७ हजार ६२१ जणांच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या असून ६३० जणांची ईसीजी तपासणी करण्यात आली. तसेच २ हजार २४३ नागरिकांना आभा व गोल्डन कार्ड काढून देण्यात आले.या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, शहरी आरोग्य यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्थांची आरोग्य यंत्रणा तसेच धर्मादाय रुग्णालयांतील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेण्यात येत आहे.गणेशोत्सवाच्या काळात नागरिक मोठ्या संख्येने गणेश मंडळांना भेट देत असल्याने मंडळांच्या ठिकाणीच आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून नागरिकांना प्राथमिक आरोग्य तपासणी, आरोग्यविषयक मार्गदर्शन तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा उपलब्ध करून दिली जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियान व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. गणेश मंडळांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणाऱ्या या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी या आरोग्य शिबिरांचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

दिव्यांग बालकांकरीता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

जालन्यात 16 फेब्रुवारी रोजी रोजी मोफत मधुमेह निदान उपचार व मार्गदर्शन शिबीर

vishwatmaklokswamivarta

लातूरमध्ये जागतिक क्षयरोग दिन उत्साहात साजरा;१०० दिवसीय विशेष शोध मोहिमेला सुरुवात

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा (ICLS) च्या २०२४ आणि २०२५ तुकडीतील अधिकारी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला.

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात किमोथेरपी सेंटर सुरु*

vishwatmaklokswamivarta

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ आषाढी वारीतील ३.८३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा