vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जालन्यात 16 फेब्रुवारी रोजी रोजी मोफत मधुमेह निदान उपचार व मार्गदर्शन शिबीर

जालन्यात 16 फेब्रुवारी रोजी रोजी मोफत मधुमेह निदान उपचार व मार्गदर्शन शिबीर

जालना/प्रतिनिधी

छाबडा हॉस्पीटल जालना, लॉयन्स क्लब ऑफ जालना मर्चेंट सिटी व रेड स्वस्तिक सोसायटी जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 16 फेब्रुवारी 2025,रविवार रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मोफत मधुमेह (डायबेटीज)निदान, चिकित्सा, उपचार व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन छाबडा हॉस्पीटल मोदीखाना,संतोषवाडी समोर जालना येथे करण्यात आले आहे.

छाबडा हॉस्पीटलच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त सदरील शिबीर मोफत घेण्यात येणार आहे.

शिबीरात मधुमेह तज्ञ डॉ. धीरज छाबडा आणि डॉ. सौ तरुणा छाबड़ा रुग्णांची तपासणी करून निदान करतील. या शिबिरात रुग्णांची संपूर्ण शारिरीक तपासणी व उपचारा बाबत निर्णय, सिनेमा स्लाईडस द्वारे रुग्ण शिक्षण, प्रश्नांची उत्तरे व शंकाचे निरासन, आहार व व्यायाम विषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

जालना शहरात 25 वर्षे आरोग्याच्या क्षेत्रात कार्यरत असलेले छाबडा हॉस्पीटल जालना नेहमीच समाजकारणासाठी कटिबद्ध आहे.

रुग्णांनी येतांना उपाशी पोटी येणे आवश्यक आहे तसेच येतांना आपले सर्व जुने रिपोर्टस् सोबत आणावे. शिबीरासाठी नांव नोंदणी दि.13 ते 15 फेब्रुवारी 2025, शनिवारपर्यंत छाबडा हॉस्पीटल मोदीखाना, संतोषवाडी समोर येथे सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहील. नाव नोंदणीसाठी फोन 02482-238567,02482-243200, मो. 9422345193 यावर संपर्क करावा. प्रथम येणार्‍या 100 रूग्णास प्राधान्य देण्यात येईल. तरी गरजूंनी त्वरित नांव नोंदणी करावी असे आवाहन जालना लॉयन्स क्लब ऑफ जालना मर्चट सिटीचे अध्यक्ष लॉ. पवन देशमुख, सचिव लॉ. आनंद वाघमारे, कोषाध्यक्ष लॉ. सुनिल भगत, रेड स्वस्तिक सोसायटीचे अध्यक्ष जितेंद्र अग्रवाल, सचिव मोहन शिंदे, कोषाधयक्ष रमेश देहेडकर, डॉ. धीरज छाबडा व डॉ तरुणा छाबडा यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

कुष्ठरोग निवारण दिन-भेदभाव समाप्त करु या, सन्मानाची वागणुक देऊ या

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा कोलवड येथून शुभारंभ;जिल्ह्यात २ लाख ३० हजार बालकांना पोलिओचे दोन थेंब देण्याचे उद्दिष्ट

० ते ५ वर्षांच्या चिमुरड्यांना मिळणार सुरक्षेचे ‘दोन थेंब’; २८ जून रोजी नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम ! ३ लाख ८८ हजारांहून अधिक बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट; यंत्रणा सज्ज, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

शिरूर तालुक्यामध्ये पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत कारवाई; मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान केल्याचा प्रकार उघड

स्टॉप डायरिया” राष्ट्रीय मोहीम ठाणे जिल्ह्यात प्रभावीपणे सुरू

नमो नेत्र संजीवनी अभियानाव्दारे हजारो रूग्णांच्या आयुष्यात प्रकाश- या अभियानात 29 सप्टेंबरअखेर 9 हजार 385 रूग्णांची तपासणी, 1 हजार 5 शस्त्रक्रिया..