vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

विशेष लेख :-70 वर्षांनी दिल्लीत रंगणार मराठी साहित्य संमेलनाचा सोहळा, होणार मराठी भाषेचा जागर! वृद्धिंगत होणार महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान!सहाव्यांदा लाभणार महिलेला संमलेनाध्यक्ष होण्याचा बहुमान!

विशेष लेख :-70 वर्षांनी दिल्लीत रंगणार मराठी साहित्य संमेलनाचा सोहळा, होणार मराठी भाषेचा जागर!

वृद्धिंगत होणार महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान!सहाव्यांदा लाभणार महिलेला संमलेनाध्यक्ष होण्याचा बहुमान!

 

नवी दिल्ली प्रतिनिधी-

      मराठी भाषा, तिचा समृद्ध वारसा आणि साहित्य क्षेत्रातील योगदान अधोरेखित करणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल 70 वर्षांनी राजधानी दिल्लीत होत आहे. सरहद संस्था आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे हे 98 वे संमेलन 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत संपन्न होणार असून साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक डॉ. तारा भवाळकर भूषवणार आहेत. यापूर्वी 1954 साली 37 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला झाले होते.

    ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांना मिळणार संमेलनाध्यक्ष होण्याचा मान!1878 साली पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. तेव्हापासून साहित्य संमेलनाची परंपरा सुरु आहे. यंदा 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे होत आहे. 1961 साली ग्वाल्हेर येथे झालेल्या 43 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद पहिल्यांदाच एका महिलेला मिळाले होते. कुसुमावती देशपांडे या पहिल्या ज्येष्ठ मराठी लेखिकेला संमेलनाध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला होता. यानंतर जवळपास 15 वर्षांनी म्हणजेच 1975 साली कऱ्हाड येथे झालेल्या 51 व्या मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होण्याचा बहुमाना दिग्गज लेखिका दुर्गा भागवत यांना मिळाला होता. यानंतर जवळपास 21 वर्षांनी 1996 मध्ये आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद शांता शेळके यांनी भूषविले. तर इंदूर येथे 2001 मध्ये झालेल्या 74 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद प्रतिभावान लेखिका विजया राजाध्यक्ष यांना मिळाले.

यानंतर 2019 मध्ये म्हणजे जवळपास 18 वर्षांनी संमेलनाध्यक्षपद होण्याचा बहुमान अरुणा ढेरे यांना मिळाला. 2019 मध्ये यवतमाळ येथे झालेल्या संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. 21 ते 23 फेब्रुवारी 2025 मध्ये नवी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद होण्याचा बहुमान डॉ. तारा भवाळकर यांना मिळाला आहे. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक डॉ.तारा भवाळकर यांची तब्बल सात दशकांनी दिल्ली येथे होत असलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे ही अभिमानाची बाब आहे. 70 वर्षांपूर्वी झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर भवाळकर यांना सन्मानाचे अध्यक्षपद मिळाले आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासात हा बहुमान संपादन करणाऱ्या भवाळकर या सहाव्या महिला ठरल्या आहेत.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर नवी दिल्लीत होणार संमेल

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा 3 ऑक्टोबर 2024 रोजी निर्णय घेतला. मराठीसह बंगाली, आसामी, प्राकृत, पाली या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. अनेक वर्षांपासून मराठी साहित्यिक, भाषा अभ्यासक आदींनी ही मागणी लावून धरली होती. मराठी भाषा हा आपला अभिमान आहे. देशाच्या इतिहासात मराठी भाषेचा समृद्ध सांस्कृतिक वारशाचं योगदान या सन्मानामुळे अधोरेखित झाले आहे. आता 70 वर्षांनंतर नवी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि या संमेलनास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

70 वर्षांनंतर दिल्लीत होणार मराठीचा जागर !

 सरहद संस्था आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 21, 22,23 फेब्रुवारी 2025 या काळात दिल्लीला होणार आहे. यापूर्वी 1954 साली 37 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला झाले होते. त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ, संमेलनाध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी तर उद्घाटक तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला या संमेलनानंतर बळ मिळाले आणि 1 मे 1960 ला

संबंधित पोस्ट

विद्याथ्यर्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठीऑनलाईन समुपदेशन करण्याकरिता राज्यमंडळ स्तरावरुन समुपदेशकांची नियुक्ती

vishwatmaklokswamivarta

*हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे* *-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन*

भारत 6 डिसेंबरपासून चंदीगड येथे चार दिवसीय इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल (IISF 2025) चे आयोजन करणार डॉ. जितेंद्र सिंह यांनी IISF 2025 च्या तयारीचा घेतला आढावा; हा महोत्सव भारताच्या विज्ञान-आधारित आणि नवोन्मेष-प्रेरित राष्ट्रामध्ये झालेल्या परिवर्तन प्रदर्शित करणार

vishwatmaklokswamivarta

लेखी आश्वासनानंतर बच्चू कडू यांचे उपोषण मागे..

केंद्रीय अर्थसंकल्प : ‘बायोफार्मा शक्ती’ उपक्रमासाठी १०,००० कोटींची तरतूद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मानले आभार

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत दोन मोठ्या नौकांचे सहकारी संस्थांना वितरण..मत्स्यव्यवसाय क्षेत्रात सहकाराच्या माध्यमातून समृद्धी आणणार- केंद्रीय मंत्री अमित शाह

vishwatmaklokswamivarta