vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अकोला व यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालये तातडीने सुरू करा-विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

अकोला व यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालये तातडीने सुरू करा-विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

मुंबई, प्रतिनिधी : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत अकोला व यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालये खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर तातडीने सुरू करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

विधानभवनात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत लातूर, अकोला, छत्रपती संभाजीनगर आणि यवतमाळ येथील चार सुपर स्पेशालिटी रुग्णालये खासगी भागीदारी धोरणानुसार सुरू करण्याबाबत आढावा बैठक झाली. बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, वैद्यकीय शिक्षण व आयुष विभागाचे आयुक्त अनिल भंडारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, अकोला व यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालये तात्काळ सुरू करण्यात यावीत. छत्रपती संभाजीनगर व लातूर सुपर स्पेशालिटी रुग्णालयासंदर्भातील कार्यवाहीही तातडीने करण्याचे निर्देश उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांनी दिले

0000

 

संबंधित पोस्ट

सैलानी यात्रा महोत्सवाचे नियोजन करावे-   पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्व तयारीचा आढावा८ ते २३ मार्च दरम्यान यात्रा महोत्सव ४-५ लाख भाविक येण्याची शक्यता

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख : कर्जमुक्ती प्रक्रियेला वेग : पात्र शेतकऱ्यांचा तपशील संकलनाची जबाबदारी बँकांवर निश्चित

पीएच.डी. अधिछात्रवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करा – व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे

विधानपरिषद कामकाज/ प्रश्नोत्तरे-उरण येथील ‘भारत मुंबई कंटेनर टर्मिनल’ला जोडणारा उड्डाणपूल सुरक्षित-सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले· जुलैअखेर दुरुस्ती पूर्ण होणार

आचारसंहिता क्षेत्रातील ७६ जणांना २४ तासांत शस्त्र जमा करण्याचे आदेश

vishwatmaklokswamivarta

मृद नमुने तपासणी केंद्र सुरू करण्याकरीता मिळणार अनुदान युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन