वेव्हज 2025- भारत सरकारच्या वतीने आयोजित पहिली जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद…
राज्य प्रतिनिधी -भारत सरकारच्या वतीने आयोजित पहिली जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद (World Audio Visual & Entertainment Summit – WAVES) येत्या 1 ते 4 मे 2025 दरम्यान महाराष्ट्रात मुंबई इथे होणार आहे. ही शिखर परिषद माध्यम आणि मनोरंजन (Media & Entertainment – M&E) क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा मैलाचा दगड ठरणार आहे.
या शिखर परिषदेच्या माध्यमातून या उद्योग क्षेत्रातील तज्ञ व्यावसायिक, गुंतवणूकदार, निर्माते तसेच नवोन्मेषकांना माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासोबत जोडून घेण्यासाठी, सहकार्यपूर्ण भागिदारी प्रस्थापित करण्यासाठी, नवोन्मेषतेसाठी आणि या क्षेत्रात स्वतचे योगदान देण्यासाठी एक सर्वोत्तम जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले गेले आहे.
वेव्हज ही शिखर परिषद भारताच्या सर्जनशील सामर्थ्याची व्याप्ती आणि विस्तार वाढवण्यासाठी तसेच आशय सामग्री निर्मिती, बौद्धिक मालमत्ता आणि तंत्रज्ञानात्मक नवोन्मेषाचे केंद्र म्हणून भारताचे स्थान अधिक बळकट करण्यासाठी सज्ज झाली आहे. या परिषदेअंर्गत प्रसारण, मुद्रित माध्यमे, दूरचित्रवाणी , नभोवाणी, चित्रपट, ॲनिमेशन, दृश्य परिणाम अर्थात visual effects, गेमिंग, कॉमिक्स, ध्वनी आणि संगीत, जाहिरात, डिजिटल माध्यमे, समाज माध्यम व्यासपीठे, जनरेटिव्ह एआय (Generative AI), वर्धित वास्तव (Augmented Reality – AR), आभासी वास्तव (Virtual Reality – VR) आणि एक्सटेंडेड रियालिटी (Extended Reality – XR) यांसारख्या उद्योग आणि क्षेत्रांवर भर दिला गेला आहे.
महत्त्वाची वैशिष्ट्ये : * क्रिएट इन इंडिया चॅलेंज (Create in India Challenge)- हा जगभरातील नवोदित कलाकारांच्या प्रतिभेचा गौरव करणारा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, या उपक्रमाच्या माध्यमातून या कलाकारांसाठी मुंबई होणाऱ्या वेव्हज शिखर परिषदेत 2025 आपली प्रतिभा जगासमोर आणण्यासाठी एक प्रतिष्ठेचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
* वेव्हेक्स 2025 (WAVEX 2025) – हे संकल्पना मा़डण्यासाठीचे कायापालट करणारे सत्र असेल. याअंतर्गत माध्यम तंत्रज्ञान विषयक आघाडीचे उद्यम भांडवलदार आणि प्रतिष्ठित गुंतवणूकदारांसमोर आपल्या संकल्पना सादर करतील, याद्वारे भारताच्या माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेच्या भविष्याला नवा आयाम मिळेल.
* वेव्हज बाजार (WAVES Bazaar) – हा उपक्रम म्हणजे चित्रपट, गेमिंग, संगीत, जाहिरात, एक्सआर आणि इतर क्षेत्रातील कलाकार, गुंतवणूकदार आणि व्यवसायांना परस्परांशी जोडणारी एक अद्वितीय जागतिक बाजारपेठ असेल. या माध्यमातून उद्योग व्यावसायिकांना उत्पन्नाचे नवे स्रोत खुले करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
* मास्टरक्लासेस आणि संवाद सत्रे (Masterclasses & Interactive Sessions) – हा उपक्रम म्हणजे या उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या तसेच जागतिक पातळीवरच्या दिग्गज व्यक्तिमत्वांकडून शिकण्याची एक दुर्मिळ संधी असेल, यामुळे माध्यम, मनोरंजन आणि तंत्रज्ञानाच्या भविष्याचे अंतरंग समजून घेता येणार आहेत.
* वेव्हजबद्दल अधिक माहितीसाठी भेट द्या: https://wavesindia.org/