vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील मनरेगाची कामे प्राधान्याने पूर्ण करा–मनरेगा आयुक्त डॉ.भरत बास्टेवाड

जिल्ह्यातील मनरेगाची कामे प्राधान्याने पूर्ण करा–मनरेगा आयुक्त डॉ.भरत बास्टेवाड

रायगड प्रतिनिधी :- जिल्ह्यातील मनरेगाच्या कामांकरिता केंद्र व राज्य शासनाकडून निधीची उपलब्धतता करुन दिली जाते. त्यामुळे जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत सुरु असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश मनरेगा आयुक्त डॉ.भरत बास्टेवाड यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित मनरेगाच्या कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा.पं.राजेंद्र भालेराव, उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांसह जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मनरेगा आयुक्त डॉ.भरत बास्टेवाड म्हणाले की, मनरेगा अंतर्गत मागील वर्षातील काही कामे प्रलंबित असतील तर ती तातडीने पूर्ण करावीत जेणेकरुन पुढील नवीन कामांकरिता निधीची मागणी करण्याकरिता अडचण भासणार नाही. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आधारसिडींगची कामे शंभर टक्के पूर्ण करावीत. मनरेगा अंतर्गत कामांची तसेच अन्य कामांची पूर्ण माहिती मिळावी, याकरिता नवीन सॉप्टवेअर तयार करण्याचे काम सुरु असून ते सॉप्टवेअर आपणास देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जीओ टॅगिंगची कामेही प्राधान्याने करावीत. जिल्ह्यात बांबू लागवडीचे क्षेत्र तसेच फळबाग लागवड वाढविण्याकरिता प्रयत्नशील राहावे. जिल्ह्यातील जलजीवन, खारभूमी बंधारे, घरकुल बांधणे तसेच अन्य काही कामे प्रलंबित असतील तर ती पूर्ण करावीत, असे निर्देशही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. मागेल त्या प्रत्येकाला काम देण्यास आम्ही तत्पर असल्याचे डॉ.बास्टेवाड यांनी सांगितले.

000000

संबंधित पोस्ट

चंद्रपूर जिल्हा बँकेतील सायबर चोरी प्रकरणी मुख्यमंत्र्यांची परवानगीने विशेष तपास पथकाद्वारे चौकशी- राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

बालकांच्या आधारवरील बायोमेट्रीक अद्यावतीकरणासाठी मोहीम

नमुंमपा आस्थापनेवर ‘गट – क’ मधील सरळसेवा पदभरती..

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर· उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय· मंत्री व अधिकाऱ्यांचे विदेश दौरे रद्द· अत्यावश्यक सोडून विशेष विमान, हेलिकॉप्टर दौरे नको· बहुतेक बैठका व्हीसीद्वारे करण्याचे निर्देश· मंत्री व अधिकाऱ्यांनी किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक वापरण्याचे निर्देश..

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

विधानसभा आश्वासनांचा अवमान थांबवा : अधिकाऱ्यांच्या मुजोरीवर आ. सुधीर मुनगंटीवार आक्रमक- लोकप्रतिनिधींच्या अधिकारांचा अवमान सहन केला जाणार नाही – आ. सुधीर मुनगंटीवार यांची परखड भूमिका