vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाराष्ट्र विधानमंडळातर्फे 8 जुलै रोजी सत्कार;”भारताची राज्यघटना” विषयावर संबोधन..

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाराष्ट्र विधानमंडळातर्फे 8 जुलै रोजी सत्कार;”भारताची राज्यघटना” विषयावर संबोधन..

मुंबई, प्रतिनिधी:- महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती श्री.भूषण रामकृष्ण गवई यांची भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र विधानमंडळातर्फे सत्कार करण्यात येणार आहे. हा सत्कार सोहळा दि. 8 जुलै, 2025 रोजी दुपारी 2.00 वाजता, मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी घोषणा आज दिनांक 04 जुलै, 2025 रोजी विधानपरिषद सभागृहात सभापती प्रा. राम शिंदे यांनी तर विधानसभेत अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी केली.

सत्कार सोहळ्यास महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानसभा उपाध्यक्ष श्री. अण्णा बनसोडे, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. अंबादास दानवे उपस्थित असतील. सर्व मंत्रीगण तसेच दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य, विधि व न्यायक्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सत्कार सोहळ्याप्रसंगी सरन्यायाधीश श्री. भूषण रामकृष्ण गवई यांचे “भारताची राज्यघटना” या विषयावर संबोधन होईल.

संबंधित पोस्ट

वैष्णवी प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया …

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने बुधवार दि. ०९ जुलै ते शुक्रवार दि. ११ जुलै या कालावधीत आयोजित केलेल्‍या श्री गुरूपौर्णिमा उत्‍सव कालावधीत तीन दिवसात साईंच्या चरणी अर्पण रु.६,३१,३१,३६२/-,सहा कोटी, एकतीस लाख, एकतीस हजार, तिनशे बासष्‍ट मात्र) इतकी देणगी प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

पुणे महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण,पुण्याला देशातील एक आधुनिकतम शहर म्हणून विकसित करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न -मुख्यमंत्री

इंडियन रेड क्रॉस सोसायटी कार्यालयाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन; रेडक्रॉस सोसायटी होणार सामाजिक सेवेचा वटवृक्ष – डॉ. किरण पाटील 

vishwatmaklokswamivarta

नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि टीम नऊ महिन्यांच्या वास्तव्यानंतर पृथ्वीवर,अंतराळयान मेक्सिकोच्या आखातात उतरताच, कॅलिफोर्नियातील स्पेसएक्स मिशन कंट्रोलने त्यांचे स्वागत या संदेशाने: केले ‘स्पेसएक्सच्या वतीने, घरी स्वागत आहे…

ग्रामीण पाणी गुणवत्ता व्यवस्थापन आणि शुद्ध पाणी पुरवठ्याचे महत्त्व

vishwatmaklokswamivarta