vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विट्स हॉटेल निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विट्स हॉटेल निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, प्रतिनिधी: छत्रपती संभाजीनगर येथील विट्स हॉटेल संबंधित वादग्रस्त निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. संबंधित निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही संपूर्ण प्रक्रिया नव्याने राबवली जाणार आहे. धनदा कॉर्पोरेशनच्या मालकीच्या विट्स हॉटेलच्या निविदा प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात येईल.

 संपूर्ण प्रकरणात पारदर्शकतेचे तत्व पाळले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कंपनीने 25 टक्के रक्कम भरली नाही त्यामुळे निविदा प्रक्रिया रद्द झाली आहे. पुन्हा नव्याने प्रक्रिया राबवत असताना पारदर्शकता पाळली जाईल आणि सर्व प्रक्रिया नियमानुसार राबवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

०००००

संबंधित पोस्ट

पुढील वर्षी 15 लाख बेघरांना घरांच्या चाव्या सुपुर्त करणार येत्या पाच वर्षात महाराष्ट्रातील प्रत्येक बेघराला पक्के घर देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • जून अखेर शेतकऱ्यांना कर्ज माफी ; नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन अनुदान• आजपासूनच 12.35 पैसे दराने कांदा खरेदी सुरु प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गतच्या पाच लाख घरांचे उत्साहात लोकार्पण…

डोंगरी महोत्सव कालावधीत चोख पोलीस राहणार एसटीच्या जादा बसेस सोडणार- पालकमंत्री शंभूराज देसाई

जालना येथे अमृतपेठ थेट बाजारपेठ प्रदर्शनाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त”मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी वाकोला मासळी बाजारातील कोळी भगिनींना केले आश्वस्त,मासळी बाजारात मासे कापण्यावर महानगरपालिकेने कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत

ई-चलानद्वारे दंडात्मक रकमेचा भरणा प्रलंबित असलेल्या वाहनमालकांनी-एआय रिकव्हरी असिस्टंस् द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणा करावा..

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून समाजाने लेखणी हातात घेतली – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले • समाजात शांतता व सलोखा राखणे ही सर्वांची जबाबदारी• जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न …