vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त”मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी वाकोला मासळी बाजारातील कोळी भगिनींना केले आश्वस्त,मासळी बाजारात मासे कापण्यावर महानगरपालिकेने कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत

“मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त”मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी वाकोला मासळी बाजारातील कोळी भगिनींना केले आश्वस्त,मासळी बाजारात मासे कापण्यावर महानगरपालिकेने कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत

मुंबई प्रतिनिधी-वाकोला येथील मासळी बाजारात मासे कापण्यावर महानगरपालिकेने कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. त्यामुळे वाकोला सह मुंबईतील सर्व मासळी बाजारांमधील कोळी भगिनींनी आणि बांधवांनी निर्धास्तपणे आपला व्यवसाय करावा. त्यांच्या पाठीशी मुंबईची महापौर म्हणून मी स्वतः खंबीरपणे उभी आहे. “मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त”, अशा शब्दात मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी मासळी व्यावसायिकांना आश्वस्त केले आहे.

🔹वाकोला येथील मासळी बाजारात मासे कापण्यास महानगरपालिकेच्या स्थानिक प्रशासनाकडून मनाई केल्याचा कथित आरोप करणारे वृत्त विविध प्रसारमाध्यम आणि समाजमाध्यमातून प्रसारित झाले आहे. या अनुषंगाने मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज सकाळी वाकोला मासळी बाजारात प्रत्यक्ष भेट देऊन कोळी भगिनींची भेट घेतली. मासे कापण्यावर महानगरपालिकेने कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. कोळी भगिनी आणि बांधवांनी निर्धास्तपणे आपला व्यवसाय करावा. मुंबईचे मूळ नागरिक म्हणून कोळी समाजाची ओळख आहे. त्यांच्या पाठीशी मुंबईची महापौर म्हणून मी स्वतः आणि संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. मासे कापण्याच्या अनुषंगाने ज्या काही बातम्या पसरवल्या गेल्या, तो अपप्रचाराचा भाग आहे. त्याला कोणीही बळी पडू नये, असे महापौर श्रीमती रितू तावडे यांनी स्पष्ट केले.

🔹यावेळी स्थानिक मासळी व्यावसायिकांशी देखील महापौरांनी संवाद साधला. आपल्याला कोणीही रोखले नसल्याचे आणि कुणीही त्रास देत नसल्याचे देखील या कोळी भगिनींनी स्पष्ट केले. जर कोणी रोखण्याचा प्रयत्न केला तर थेट माझ्याशी संपर्क करावा, सर्व अडचणींचे निराकरण मी स्वतः करीन, असे महापौरांनी या कोळी भगिनींना आश्वासन दिले.

00000

संबंधित पोस्ट

जालन्यात मोकाट कुत्रे व नागरी समस्यावर शिवसेना आक्रमक जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्वात उग्र आंदोलनभवानीनगर येथे मोकाट कुत्र्यांनी तोडले चिमुकल्याचे लचके..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय समाज पक्षाने किसान सेल रासपा तालुका अध्यक्ष घनसांगी वैजनाथ केशवराव वायसे यांची नियुक्ती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औषध निरीक्षक गट-बचाळणी परीक्षा २२ मार्च रोजी; ११६४० उमेदवारांची बैठक व्यवस्था..

दिव्यांग बांधव व अनाथ बालकांसह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन

vishwatmaklokswamivarta

शास्त्री चौक-काळीवाट रस्ता 27 सप्टेंबरपासून दोन महिने वाहतुकीस बंद

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खास मुलाखतीत स्पष्ट केलं की, मुंबईचा पुढील महापौर महाराष्ट्रातील महायुतीचाच असेल आणि तो हिंदू व मराठीच …