vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खास मुलाखतीत स्पष्ट केलं की, मुंबईचा पुढील महापौर महाराष्ट्रातील महायुतीचाच असेल आणि तो हिंदू व मराठीच …

मुंबईचा पुढील महापौर महाराष्ट्रातील महायुतीचाच असेल आणि तो हिंदू व मराठीच.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 मुंबई प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खास मुलाखतीत स्पष्ट केलं की, मुंबईचा पुढील महापौर महाराष्ट्रातील महायुतीचाच असेल आणि तो हिंदू व मराठीच असेल.

मुंबई महानगरपालिकेच्या या या निवडणुकांमध्ये नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी युती केली आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची साथही त्यांना आहे. तर दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे आणि भाजपाची युती आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी वेगळी लढते आहे. तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. प्रचारसभा सुरु होतील, दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा महापौर मराठीच होईल असं म्हटलं आहे.

मुंबईत पूर्वी बाहेरुन मजूर यायचे, आता या शहरात वेगवेगळे लोक येतात. पण मुंबईचं मुंबई पण कुणीही घालवू शकत नाही. मुंबईच्या गणेशोत्सवात पारंपरिक मराठी पद्धतीनेच उत्सव साजरा होतो. त्यामुळे मुंबईची संस्कृती ही टिकवायची आहेच. मुंबईची संस्कृती आणि तिची वाटचाल इकडे तिकडे जाऊ देणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईचा महापौर महायुतीचा होईल, मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि मुंबईचा महापौर मराठीच होईल, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे. अशी बातमी डीडी न्यूज वर आलेली आहे

संबंधित पोस्ट

राज्य लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी   – आयुक्त डॉ. किरण जाधव…

vishwatmaklokswamivarta

एलपीजीचा अवैध साठा, काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

भाषिक भेदभावाची भूमिका संविधानविरोधी असून परप्रांतीयांवर दादागिरी करणे योग्य नाही ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मरोळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मासळी बाजार व कोळी भवन उभारावे -मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या तयारीसाठी सुवर्णसंधी एस.एस.बी. कोर्ससाठी मोफत प्रशिक्षण…

vishwatmaklokswamivarta

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त शनिवारी (दि.३१) बाईक रॅली