vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

एलपीजीचा अवैध साठा, काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

एलपीजीचा अवैध साठा, काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

 सांगली,  प्रतिनिधी : युध्दजन्य परिस्थितीचा परिणाम आपल्या देशावरच नाही तर संपूर्ण जगावर पडला आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी देशहितार्थ सर्वांनी सहकार्य करावे. एलपीजीचा अवैध वापर टाळण्यासाठी व एलपीजी पुरवठा सुरळीत होण्यासाठी संबंधित विभागांनी एलपीजीचा अवैध साठा व काळा बाजार करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिल्या. एलपीजी वितरण साखळी नियमित ठेवण्यासाठी व प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी आयोजित विशेष समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस पोलीस अधीक्षक तुषार दोशी, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके, समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, पुरवठा निरीक्षक स्वप्नील फडतरे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, गॅस वितरक आदि उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, गॅसचा अवैध वापर टाळण्यासाठी पथक नेमून नियमित छापे टाकावेत, गॅस ट्रान्सपोर्टची तपासणी करावी, गॅस वितरकांनी व्यावसायिक गॅस वितरण करताना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करत प्राधान्याने रूग्णालये, शासकीय वसतिगृहे, अंगणवाडी, शाळा, शासकीय आश्रमशाळा व महाविद्यालयातील मेस यांना मागणीनुसार अत्यावश्यक सेवा म्हणून गॅस पुरवठा करावा. दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार गॅस वितरण होते का याची तपासणी केली जावी. गॅस वितरकांनी त्यांना दिलेल्या गुगल शिटवर दैनंदिन गॅस वितरणाची माहिती भरून अद्ययावत करावी. घरगुती गॅसचा अवैध वापर होऊ नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनीही एलपीजी पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी विविध सूचना केल्या. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांबाबत माहिती दिली. गॅस वितरकांनीही त्यांच्या विविध समस्या मांडल्या.

 

00000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिकेस पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘हरित यशोगाथा सर्वांगीण उत्कृष्टता’ पुरस्कार*

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना मिशन मोडवर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा-पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – मंत्री छगन भुजबळ

जिल्हाधिकाऱ्यांची पिंपरी गावात भेट शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची केली विचारपूस..

सुषमा स्वराज या अष्टपैलू प्रतिभावंत राजकारणी – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१जिल्ह्यात मार्च व एप्रिल महिन्यात मंडळस्तरावर शिबिरांचे आयोजन