vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सुषमा स्वराज या अष्टपैलू प्रतिभावंत राजकारणी – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

सुषमा स्वराज या अष्टपैलू प्रतिभावंत राजकारणी – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई, प्रतिनिधी: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना ‘अग्निशिखा सुषमा स्वराज’ या हिंदी अनुवादित पुस्तकाची पहिली प्रत भेट देण्यात आली. डॉ. मेधा सोमय्या यांनी मूळ मराठीत लिहिलेल्या या पुस्तकाचा हिंदी अनुवाद अमरजीत मिश्र यांनी केला आहे. सुषमा स्वराज या अष्टपैलू प्रतिभावंत राजकारणी होत्या. आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत भूषविलेल्या प्रत्येक पदावर त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला होता, असे उद्गार राज्यपालांनी याप्रसंगी काढले.सुषमा स्वराज या अमोघ वक्त्या होत्या; उत्कृष्ट संसदपटू होत्या; लढवय्या विरोधी पक्ष नेत्या आणि कार्यक्षम मंत्री होत्या. आज समाजाला त्यांच्यासारख्या समकालीन आदर्श व्यक्तिमत्वाची (रोल मॉडेल) गरज आहे असे राज्यपालांनी सांगितले. स्वराज यांनी केलेले संस्कृत मधील एक भाषण इतके अस्खलित आणि विद्वत्ता प्रचुर होते की संस्कृतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी ते ऐकावे. आपण विद्यापीठांना सुषमा स्वराज यांचे ते भाषण संस्कृत विद्यार्थ्यांसाठी ऐकण्यास उपलब्ध करण्याची शिफारस करु असेही त्यांनी सांगितले.

उत्तर पूर्वेकडील राज्यात पक्ष संघटन कमजोर होते. सुषमाजी मात्र कार्यकर्त्यांच्या निमंत्रणावरून आवर्जून उत्तर पूर्वेकडील राज्यांना भेट द्यायच्या. भाषणाला जाण्यापूर्वी त्या स्थानिक भाषेतील शब्द, वाक्य समजून घ्यायच्या व भाषणात वापरायच्या. त्यामुळे त्या उत्तर पूर्वेत अतिशय लोकप्रिय होत्या असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी लेखिका डॉ. मेधा सोमैया व अनुवादक अमरजीत मिश्र यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री डॉ. किरीट सोमय्या, नगरसेवक डॉ. नील सोमय्या, मुंबईचे माजी उपमहापौर अरुण देव तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

००००

संबंधित पोस्ट

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबईकरांच्या स्वप्नांना आकार देणारे विकासाचे माहेर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन सतर्क- हॉटेल्स व आस्थापनांमध्ये सखोल तपासणीचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

वसमत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुला-मुलींचे वसतीगृह उभारणार· सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट· जमीन मिळताच निधी मंजूर

सेवा संकल्प शिबीर’ जिल्ह्यातील रुग्णांना उत्तम आरोग्यसुविधा उपलब्ध करून देणार – पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे

सरकारची मराठा-ओबीसी ऐक्याला धक्का देणारी भूमिका — डॉ. संजय लाखे पाटील; उपसमितीला पडताळणीचा अधिकार नाही

महाराष्ट्रामध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत

vishwatmaklokswamivarta