vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त शनिवारी (दि.३१) बाईक रॅली

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त शनिवारी (दि.३१) बाईक रॅली

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जागतिक आरोग्य संघटनेद्वारे तंबाखू विरोधी दिवस दरवर्षी दि.३१ मे रोजी पाळला जातो. यानिमित्त तंबाखू विरोधात जनजागृतीसाठी जिल्हा तंबाखू नियंत्रण समितीच्या वतीने शनिवार दि.३१ रोजी सकाळी ७ वा. बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक तथा जिल्हा तंबाखू नियंत्रण समिती व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे सचिव डॉ. दयानंद मोतीपवळे यांनी दिली असून सहभागाचे आवाहन केले आहे.

 यंदाच्या जागतिक तंबाखू विरोधी दिनाची मुख्य संकल्पना ‘आकर्षणाचा मुखवटा उतरवू या!’ ही आहे. तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांच्या जाहिरातीत वापरले जाणारे मोहक मुखवटे उतरवणे आणि लोकांना फसवणूक करणारी धोरणे समजावून सांगणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने राज्यभरात ४५ दिवासाचे अभियान राबविण्याचे धोरण आखले आहे. या अभियानातंर्गत सामाजिक जनजागृती उपक्रम, तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था, तंबाखूमुक्त शासयकी कार्यालये, तंबाखूमुक्त आरोग्य संस्था, कोटपा कायदा २००३ ची प्रभावी अंमलबजावणी आणि तंबाखूमुक्त गाव असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याबाबत जनजागृतीसाठी जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय आणि मेडीकव्हर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.३१ रोजी सकाळी ७ वा मोटार बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.या रॅलीची सुरुवात मेडीकव्हर हॉस्पिटल, सेवन हिल, क्रांती चौक ते परत मेडीकव्हर हॉस्पिटल हा मार्ग असेल. या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक तथा जिल्हा तंबाखू नियंत्रण समिती व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे सचिव डॉ. दयानंद मोतीपवळे यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

इंडियन ऑईल’च्या सीएसआर उपक्रमातून कूपर रुग्णालयास बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चंद्रपूर जिल्ह्यात कोळंबी पालन व्यवसायाला चालना देणार – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

नवी मुंबई विमानतळावर राष्ट्रीय आपत्ती रंगीत तालीम

राज्यात आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा मोठा विस्तार २३९९ उपचार कॅशलेस; रुग्णालयांवर कडक नियंत्रण

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पद्धतीने राबविणार..

vishwatmaklokswamivarta