vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नवी मुंबई विमानतळावर राष्ट्रीय आपत्ती रंगीत तालीम

नवी मुंबई विमानतळावर राष्ट्रीय आपत्ती रंगीत तालीम

 

 रायगड- प्रतिनिधी:-आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सज्जता वाढविण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात दि. ९ एप्रिल २०२६ रोजी आपत्कालीन रंगीत तालीम (मॉक एक्सरसाइज) आयोजित करण्यात आली आहे. ही तालीम राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मुंबई, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडणार आहे.

या रंगीत तालमीमध्ये विविध आपत्तीजन्य परिस्थितींचे प्रतिकात्मक सादरीकरण करून आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेची कार्यक्षमता तपासली जाणार आहे. विमान अपघात, आग, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आदी प्रसंगांवर तात्काळ आणि समन्वयाने कशी कार्यवाही केली जाते, याचा सराव करण्यात येणार आहे

यावेळी पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, आपत्कालीन सेवा यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांचा सक्रिय सहभाग राहणार असून, विविध यंत्रणांमधील समन्वय अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. नागरिकांनी या काळात कोणतीही अफवा पसरवू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

जलसाक्षरतेसाठी लोकचळवळ आवश्यक – पालकमंत्री मकरंद जाधव पाटील• जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा समारोप

vishwatmaklokswamivarta

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ‘पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा’ उपक्रमात सहभागी व्हा!२२ एप्रिल ते १ मे २०२५ या कालावधीत राज्यात विविध उपक्रम साजरे होणार – पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मंत्री पंकजा मुंडे

राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविणार..

अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती निमित्त पाहेगावात विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद” – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांचे मार्गदर्शन” 

थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पैतृक गावी खानवडी, पुणे येथे त्यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस