vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या तयारीसाठी सुवर्णसंधी एस.एस.बी. कोर्ससाठी मोफत प्रशिक्षण…

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या तयारीसाठी सुवर्णसंधी एस.एस.बी. कोर्ससाठी मोफत प्रशिक्षण…

मुंबई प्रतिनिधी : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ ते १२ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत एस.एस.बी. (SSB) कोर्स क्र. ६३ आयोजित करण्यात आला आहे. या कोर्समध्ये प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास आणि भोजनाची सोय करण्यात आली आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी दिनांक २० ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे मुलाखतीस हजर रहावे. उमेदवारांनी सैनिक कल्याण विभाग (Department of Sainik Welfare, Pune) च्या वेबसाईटवरून SSB-६३ कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबतची परिशिष्टे डाउनलोड करून ती पूर्ण भरून, मुलाखतीच्या दिवशी सोबत आणणे आवश्यक आहे

पात्रता -या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे पुढीलपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे:

1. कंबाईंड डिफेन्स सर्विसेस एक्झामिनेशन(CDSE-UPSC) किंवा नॅशनल डिफेन्स अकेडमी एक्झामिनेशन(NDA-UPSC) परीक्षा उत्तीर्ण, तसेच सर्विसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखतीसाठी पात्रता प्राप्त केलेली असावी

2. एनसीसी ‘C’ प्रमाणपत्र ‘A’ किंवा ‘B’ ग्रेडसह उत्तीर्ण, आणि एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरकडून यस एस एस बी SSB साठी शिफारस मिळालेली असावी.3. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स साठी (Technical Graduate Course) साठी SSB कॉल लेटर असणे आवश्यक

4. विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी SSB कॉल लेटर किंवा शिफारस यादीत नाव असलेले असावे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे ईमेल (training.petenashik@gmail.com), दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 किंवा व्हॉट्सअॅप नंबर 9156073306 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहेआहे.

00000

संबंधित पोस्ट

बुलढाणा जिल्हा गुंतवणूक परिषद मंगळवारी- गुंतवणूकदार, उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन- सामंजस्य करार करण्याची संधी

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यशकथा भाग 2 अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मदतीने मंदार शिंदेची मेणबत्ती, कापूर व्यवसायवृद्धी …

vishwatmaklokswamivarta

समडोळी येथे शास्त्रज्ञ व शेतकरी संवाद कार्यक्रम संपन्न

भिवंडी तालुक्यातील सोनाळे जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात संपन्न..

दिवाळीनिमित्त खासगी वाहतूकदारांकडून होणाऱ्या जादा भाडे आकारणीला आळा घालण्यासाठी ठाण्यात विशेष तपासणी मोहीम

vishwatmaklokswamivarta

घरकुल, आरोग्यसह विविध सुविधांपासून कातकरी समाज वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी- मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन