vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कृषी मित्र’ भरतीच्या नावाखालील बोगस जाहिरातींपासून सावध राहा – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार

कृषी मित्र’ भरतीच्या नावाखालील बोगस जाहिरातींपासून सावध राहा – कृषी मंत्री दत्तात्रय भर फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार..

मुंबई, प्रतिनिधी : राज्यात ‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखाली सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे काही व्यक्तींकडून बोगस जाहिराती प्रसारित करून शेतकरी, युवक व नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा कोणत्याही खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये, तसेच कोणीही याला बळी पडून नये, असे आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही भरती प्रक्रियेची माहिती केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर, अधिकृत प्रसिद्धी माध्यमांद्वारे किंवा संबंधित कार्यालयांमार्फतच जाहीर केली जाते. त्यामुळे सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित जाहिराती, अर्जासाठी शुल्क भरण्याच्या सूचना, वैयक्तिक बँक खात्यावर पैसे जमा करण्याचे आवाहन किंवा संशयास्पद लिंक यांना बळी पडू नये.

यासंदर्भात माहिती देताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, “कृषी मित्र भरतीच्या नावाखाली शेतकरी, युवक आणि नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणतीही गय केली जाणार नाही. खोट्या व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसारित करून फसवणूक करणाऱ्या व्यक्ती अथवा संबंधितांवर कृषी विभागामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. नागरिकांनी अशा बोगस जाहिरातींपासून सावध राहून भरतीसंदर्भातील माहितीची खातरजमा अधिकृत माध्यमांतूनच करावी.”

नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद जाहिराती किंवा संदेश आढळल्यास तात्काळ संबंधित कृषी विभागाच्या कार्यालयास अथवा स्थानिक पोलीस प्रशासनास माहिती द्यावी, असेही आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्तीसगड सीमेवरील दुर्गम कवंडे गावात- 12 कुख्यात नक्षल्यांची शस्त्रांसह शरणागती- आत्मसमर्पण केलेल्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्यालाही उपस्थिती- सी-60 जवानांचा सत्कार, अत्याधुनिक एके-103 आणि पिस्तुले दिली- बुलेटप्रुफ वाहनांसह 19 वाहने पोलिसांच्या सेवेत- कोरमा नाल्यावरील आंतरराज्यीय पुलाची ड्रोनने पाहणी…

डाक सेवेतील तक्रारींच्या निवारणासाठी 8 जून रोजी डाक अदालत

दर्गाह शरीफ शाह तजम्मुल शाह ऊर्फ पंखेवाले बाबा ट्रस्टच्या मिळकतीची फेरमोजणी करा- मंत्री दत्तात्रय भरणे

अमृत दुर्गोत्सव २०२५’ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रमाणपत्र केले सुपुर्द· महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी संस्थेच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल…

vishwatmaklokswamivarta

मोतीबिंदू मुक्त राज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी सदैव प्रयत्नशील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,विदर्भातील मास्टेक व शंकरा फाऊंडेशन, यूएसए संस्थाचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुलावर सामुहीक योग शिबिराचे आयोजन