vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अमृत दुर्गोत्सव २०२५’ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रमाणपत्र केले सुपुर्द· महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी संस्थेच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल…

‘अमृत दुर्गोत्सव २०२५’ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रमाणपत्र केले सुपुर्द· महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी संस्थेच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल…

                  मुंबई, प्रतिनिधी: इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे. संस्थेच्या ‘अमृत दुर्गोत्सव २०२५’ या उपक्रमाने ‘मानवी हातांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचा सर्वात मोठा डिजिटल फोटो अल्बम’ या श्रेणीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविला आहे. या विक्रमाचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र देऊन अमृत संस्थेला सन्मानित करण्यात आले. या विक्रमाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे सुपुर्द करण्यात आले.   यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी उपस्थित होते.

     मुख्यमंत्री फडणवीस यांनी या यशाबद्दल ‘अमृत’ संस्थेचे अभिनंदन केले. महाराष्ट्राची दुर्गसंस्कृती ही आपल्या इतिहासाचे प्रतीक आहे. ‘अमृत दुर्गोत्सव’ या उपक्रमाद्वारे नव्या पिढीला या ऐतिहासिक वारशाशी जोडण्याचे उल्लेखनीय कार्य अमृत संस्थेने केले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

    ‘अमृत दुर्गोत्सव २०२५’ या उपक्रमाद्वारे युनेस्को मान्यताप्राप्त १२ ऐतिहासिक गड-दुर्गांच्या प्रतिकृतींसोबत सेल्फी काढून ते दुर्गोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. महाराष्ट्रासह देशातील विविध राज्ये आणि इतर देशातील नागरिकांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक नागरिकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे डिजिटल अभिनंदनपत्र देण्यात आले.

संबंधित पोस्ट

📢 महत्वाची सूचना – किल्ले रायगडावर पायरी मार्ग बंद!

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, मुंबई शहर यांच्या मार्फत सन २०२६-२७ साठी ‘५० टक्के अनुदान योजना’ (७ लाभार्थी) आणि ‘बीज भांडवल योजना’ (१० लाभार्थी’) याअंतर्गत पात्र लाभार्थ्यांकडून कर्ज प्रस्ताव मागविण्यात आले

विभागीय माहिती कार्यालयाच्या हिंद-दी-चादर निबंध व घोषवाक्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विटा नगरपरिषदेचा सन्मान- ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024 सुपर स्वच्छता लीग मध्ये देशात प्रथम- 20 ते 50 हजार लोकसंख्या गटामध्ये कामगिरी- कचरामुक्त शहराचे पंचतारांकित मानांकन

अमरावती जिल्ह्यात दर्यापुर-अमरावती मार्गावरच्या लाखापुर येथे झालेल्या एस टी बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर १० जण गंभीर जखमी 

बाबासाहेबांच्या विचारांतून घराघरात लोकशाही येईल असा नमुंमपा जागर व्याख्यानमालेत ॲड.वर्षा देशपांडे यांचा विश्वास*