vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसायस्थानिक बातम्या

उद्योजकता विकास व प्रेरणादायी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न

उद्योजकता विकास व प्रेरणादायी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:-महाराष्ट्र राष्ट्र सेंटर फॉर एंटस्पेनरशिप डेव्हलपमेंट (MCED) आणि महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या संयुक्त विद्यमाने 21 दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम तसेच 2 दिवसीय ध्येय कृतीत आणण्यासाठी अभि प्रेरणा प्रशिक्षण (Achievement & Motivational Training) पनवेल येथे यशस्वीरीत्या संपन्न झाले असून या उपक्रमाला पनवेल व आसपासच्या भागातील लाभार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

21 दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये नवउद्योजकांना व्यवसाय उभारणी, उद्योग विस्तार, मार्केटिंग धोरणे, वित्तीय व्यवस्थापन, बाजारपेठ विश्लेषण आणि डिजिटल साधनांचा वापर या विषयांवर तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी लाभार्थ्यांना त्यांच्या उद्योगाचा विस्तार करण्याच्या संधी ओळखणे, योजनाबद्ध पद्धतीने व्यवसाय वाढविणे आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याचे कौशल्य विकसित करण्यात आले.

अलिबाग येथे पार पडलेल्या 2 दिवसीय ध्येय कृतीत आणण्यासाठी अभि प्रेरणा प्रशिक्षण (Achievement & Motivational Training) मध्ये सहभागींना स्व-उत्कर्ष, लक्ष्य निर्धारण, नेतृत्वगुण, आत्मविश्वास वृद्धी आणि उद्योजकीय मनोवृत्ती (Entrepreneurial Mindset) निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी सत्रे आयोजित करण्यात आली. या सत्रांमुळे नवउद्योजकांमध्ये आत्मविश्वास वाढून उद्योग क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले प्रशिक्षणादरम्यान शासनाच्या विविध उद्योजकता व स्वावलंबन योजनांची माहिती, व्यवसाय विस्ताराचे मार्ग आणि आर्थिक साहाय्याच्या संधीबाबत सविस्तर जागृती करण्यात आली.

अमृत’ या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेचे “रायगड जिल्हा” व्यवस्थापक शैलेश विनायक मराठे व एमसीईडी चे प्रकल्प अधिकारी आनंद विद्यागर यांनी सांगितले की, “या प्रशिक्षण उपक्रमांच्या माध्यमातून युवकांना रोजगारनिर्मिती, स्वावलंबन आणि उद्योगविकासाच्या दिशेने प्रेरित करणे हे आमचे प्रमुख उहिष्ट आहे. पुढील काळातही अज्ञा प्रशिक्षण कार्यक्रमांची शृंखला राबविण्यात येईल.

 

00000000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष श्री. शेरसिंग डागोर यांची नवी मुंबई महानगरपालिकेत आढावा बैठक…

vishwatmaklokswamivarta

केरोसीनचे टँकर प्राप्त झाले आहे. गोदाम व्यवस्थापकाच्या उपस्थितीत 12 हजार लिटर केरोसीन 124 परवानाधारकास वितरित

महाराष्ट्र शासनाचे ८,१८,२८ वर्षे मुदतीचे रोखे विक्रीस

आपत्ती काळात यंत्रणांनी सतर्क रहावे- मुख्य सचिव सुजाता सौनिक,मदतीबातची माहिती समाजमाध्यमे, इलेक्ट्रॉनिक मिडिया व वृत्तपत्रांत ठळकपणे द्यावी शासन-प्रशासन आपदग्रस्तांच्या पाठीशी असल्याचा विश्वास द्यावा

बांधकाम कामगारांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कोठूनही करता येणार-बायोमॅट्रीक व कागदपत्रे तपासणी सुविधा केंद्रावरच- कामगार मंत्री आकाश फुंडकर

vishwatmaklokswamivarta

पावसाळ्यात झाडे पडणे ही केवळ नैसर्गिक घटना नाही; ती मानवनिर्मित आपत्ती !  सुराज्य अभियान,झाडांच्या मुळांची गळचेपी करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधा’चा गुन्हा दाखल करा !