vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महारेशीम अभियान २०२५;वर्षभरात २.२५ मे.टन धागा निर्मिती-जनजागृतीसाठी प्रचार रथ रवाना

 महारेशीम अभियान २०२५;वर्षभरात २.२५ मे.टन धागा निर्मिती-जनजागृतीसाठी प्रचार रथ रवाना

 

राज्य प्रतिनिधी –

छत्रपती संभाजीनगर,-राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणानुसार रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी ‘महारेशीम अभियान २०२५’ राबविण्यात येत असून या अभियानाच्या प्रचारार्थ व रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी आज एक प्रचार रथ रवाना झाला. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २.२५ मे.टन रेशीम धाग्याची निर्मिती झाली आहे. आणखी शेतकऱ्यांनी या उद्योगाकडे वळावे यासाठी हा प्रचार रथ जनजागृती करणार आहे.

   जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते या रथास हिरवी झेंडी दाखविण्यात आली. जिल्ह्यात १०० गावांमध्ये हा रथ जाऊन रेशीम उत्पादनाविषयी जनजागृती करणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा रेशीम विकास अधिकारी बी.डी.डेंगळे, क्षेत्रिय अधिकारी बी.बी. जायभाये आदी यावेळी उपस्थित होते.

रेशीम उद्योग हा शेतीला पूरक उद्योग म्हणून पाहिला जातो. राज्यात पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर अशा विभागातील २७ जिल्ह्यांमध्ये रेशीम उत्पादन घेतले जाते.तुतीची लागवड करुन त्यावर रेशीम कोषांची जोपासना करणे हा रेशीम निर्मिती प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा होय. एकरी २ ते अडीच लाख रुपये इतके उत्पादन याद्वारे मिळू शकते. एकदा तुती लागवड करुन १० ते १२ वर्ष उत्पादन घेता येते.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सन २०२४-२५ साठी ११३५ शेतकरी निवडण्यात आले असून १२५२.५० एकर क्षेत्रावर तुतीची लागवड केली आहे.या वर्षभरात डिसेंबर २०२४ अखेर २ लाख २० हजार ७७५ लक्ष अंडीपुंज वाटप करण्यात आले असून त्याद्वारे १५९.४७२ मे.टन कोष उत्पादन झाले त्यापासून २.२५ मे.टन धागा निर्मिती करण्यात आली.

  शासनाचे चिकलठाणा येथे रेशीम फार्म असून तेथे अंडीपुंज निर्मिती केंद्र, निवासी शेतकरी प्रशिक्षण केंद्र, चॉकी किटक संगोपन केंद्र व रेशीम किटक संगोपन केंद्र आहेत. जिल्ह्यात २ रेशीम धागा निर्मितीचे खाजगी प्रकल्पांनाही मंजूरी देण्यात आली आहे. सन २०२५ करिता जिल्ह्याला रेशीम, कृषी व जिल्हा परिषद असे मिळून ११०० एकर क्षेत्रावर तुती लागडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची रेशीम उत्पादनासाठी नोंदणी करण्याचे कामही हा प्रचार रथ करणार असून ९ फेब्रुवारी पर्यंत हा रथ जिल्ह्यात जनजागृती करणार आहे, अशी माहिती बी.डी. डेंगळे यांनी दिली.

 या योजनेअंतर्गत एक एकर रेशीम प्रकल्पासाठी तीन वर्षामध्ये तुती लागवड व जोपासनेसाठी ६८२ मनुष्य दिवस व किटक संगोपनगृह बांधकामासाठी २१३ मनुष्य दिवस असे एकूण ८९५ मनुष्य दिवसांची मजुरी अकुशल घटकांतर्गत लाभार्थ्याला मस्टरद्वारे अदा केली जाते. त्याबरोबरच कीटक संगोपन साहित्य व कीटक संगोपनगृह बांधकाम साहित्य खरेदीसाठी कुशल घटकांतर्गत १ लाख ५३ हजार रुपये ही अदा करण्यात येते. सहभागी होणाऱ्या लाभार्थ्यांना एकूण रक्कम ४ लाख १८ हजार ८१५ रूपयेलाभ मिहणार असून लाभार्थ्यांनी स्वतः मजूर म्हणून स्वतःच्या शेतात काम करणे आवश्यक आहे. लाभार्थ्याकडे मध्यम ते भारी व पाण्याची निचरा होणारी जमीन असावी तसेच तुती लागवड क्षेत्रासाठी किमान आठमाही पाणी पुरेल अशी सिंचनाची पुरेशी सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे.

 मनरेगा योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या लाभार्थ्यांना केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र-२ या योजनेतून तुती लागवड, ठिबक सिंचन सुविधा, कीटक संगोपनगृह बांधकाम तसेच कीटक संगोपन साहित्य खरेदीसाठी रक्कम रूपये ३ लाख ७५ हजार रुपये इतके अनुदान दिले जाते.

तुती लागवडीसाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालय ज्ञानपिठ कॅम्पस नं.२, पहिला मजला, प्लॉट नं.टी-१८, एम आय डी सी एरीया, गरवारे स्टेडीयम समोर, नारेगाव मेन रोड, चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर पिन ४३१२१० दूरध्वनी क्र. ०२४०-२९९४६४७, ई मेल आयडी :-dsosilkabad1@gmail.com येथे संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.०००००

संबंधित पोस्ट

राज्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीला पायबंद घालण्यासाठी दुग्धव्यवसाय मंत्री श्री.राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जिल्हास्तरीय समिती गट करण्याविषयी सूचित, धडक कारवाई सुरू

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजी नगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केली जायकवाडी समांतर पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी…

ओनरशिपमधील इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार,विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाची तरतूद..

शिव तांडव स्तोत्र पठण कार्यक्रमातून आध्यात्मिक वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवतांडव स्तोत्र पठण कार्यक्रमाला उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

महानगरपालिका क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर वाहतूक नियोजन जाहीरनामा प्रसिध्द

भाजप साठी जालना विधानसभेची जागा मिळणेसाठी प्रयत्न करणार जालना विधानसभा भाजपा बहुमताने जिंकणार-माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे

vishwatmaklokswamivarta