vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात MY Bharat पोर्टल नोंदणी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद…

बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात MY Bharat पोर्टल नोंदणी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद…

जालना, प्रतिनिधी : माय भारत, जालना, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात Intensive Registration & Awareness Drive चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या अभियानाचा उद्देश जास्तीत जास्त युवकांना MY Bharat या राष्ट्रीय युवा व्यासपीठाशी जोडून त्यांना स्वयंसेवा, कौशल्य विकास, नेतृत्व विकास, प्रशिक्षण तसेच विविध शासकीय योजनांच्या संधींबाबत जागरूक करणे हा होता.

 

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना MY Bharat पोर्टलचे महत्त्व, उद्दिष्टे आणि त्याद्वारे उपलब्ध होणाऱ्या विविध संधींची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलद्वारे प्रत्यक्ष MY Bharat पोर्टलवर नोंदणी करून देण्यात आली. QR Code स्कॅन करून नोंदणी प्रक्रिया, प्रोफाइल पूर्ण करण्याची पद्धत आणि भविष्यातील विविध उपक्रमांमध्ये सहभाग कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने नोंदणी केली.

 

सदर उपक्रमाचे आयोजन मयुरकुमार गोरमे, जिल्हा युवा अधिकारी, MY Bharat, जालना आणि प्रभारी प्राचार्य प्रा. विलास भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांनी युवकांनी MY Bharat पोर्टलशी जोडून राष्ट्रनिर्मिती, सामाजिक सेवा आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

 

कार्यक्रमाची प्रास्ताविक कु. हितीशा खिलोशिया यांनी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. ओम चव्हाण (कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना), प्रा.निधी शुक्ला (NCC), डॉ. स्वाती पुरी (कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना), प्रा. रामेश्वर म्हस्के,(कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना), प्रा. कुणाल देशपांडे, प्रा. कुंभार , प्रा.कांचन कायंदे (कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना), युवा बहुउदेशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जयपाल राठोड व महाविद्यालय प्रशासन, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले

संबंधित पोस्ट

उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करून ‘बेस्ट’ व्हावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट)आढावा बैठक..

पलूस महाविद्यालयात जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा

सहकारी बँकेमुळे स्थानिक भांडवल निर्मिती व विकास साध्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा भरारी पथकांची स्थापना करावी – राज्य निवडणूक आयुक्त

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या हस्ते जेएन पोर्ट-पीएसए मुंबई टर्मिनल (बीएमसीटी) फेज-२ चे हैद्राबाद हाऊस, नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे अनुपालन करून मोकाट कुत्र्यांना आवर घालण्यासाठी उपाय योजावेत- जिल्हाधिकारी अशोक काकडे- जिल्हा प्राणीक्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीत सूचना

vishwatmaklokswamivarta