vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मध्यपूर्व देशांत अडकलेले नांदेडचे ५९ नागरिक सुरक्षित**अडकलेल्या नागरिकांनी ‘नवीन सहाय्यता गल्फ’ लिंकवर माहिती भरण्याचे आवाहन*

*मध्यपूर्व देशांत अडकलेले नांदेडचे ५९ नागरिक सुरक्षित**अडकलेल्या नागरिकांनी ‘नवीन सहाय्यता गल्फ’ लिंकवर माहिती भरण्याचे आवाहन*

 

नांदेड, प्रतिनिधी :- नांदेड जिल्ह्यातील एकूण ५९ नागरिक दुबई, शारजाह, कतार, बहरीन व सौदी अरेबिया या मध्यपूर्व देशांमध्ये असून ते सर्व सुरक्षित असल्याची माहिती आज दि. ५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली आहे.

दरम्यान, मध्यपूर्व देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांचे अचूक स्थान व इतर आवश्यक माहिती मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राकडून ‘नवीन सहाय्यता गल्फ’ ही लिंक जारी करण्यात आली आहे

तरी नांदेड जिल्ह्यातील जे नागरिक मध्यपूर्व देशांमध्ये अडकून पडले आहेत त्यांनी संबंधित लिंकवर जाऊन आपली माहिती भरावी. तसेच यापूर्वी जुन्या गुगल शीटमध्ये माहिती भरलेल्या ५९ नागरिकांनीही नव्याने या लिंकवर माहिती भरावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

तसेच आखाती देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनीही ही लिंक संबंधित व्यक्तींना पाठवून त्यांना माहिती भरण्यास सांगावे, जेणेकरून अडकलेल्या नागरिकांचे अचूक स्थान शासनाला समजू शकेल व आवश्यक मदत पोहोचविणे सुलभ होईल.

तरी याबाबतीत काही शंका असल्यास जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे (02462) 235077 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

h

संबंधित पोस्ट

प्रवासी व एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी कटिबद्ध – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षित महिना- २०२५’ चे उद्घाटन व नवीन इलेक्ट्रिक बस लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न

vishwatmaklokswamivarta

पाणी पुरवठा योजनांची अपूर्ण कामे वेगात पूर्ण होण्यासाठी विभागीय आयुक्तांना अतिरिक्त अधिकार – मंत्री गुलाबराव पाटील

महाराणा प्रताप सिंहांचे जीवन म्हणजे स्वाभिमान, त्याग व स्वराज्यासाठीचा झुंजार लढा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीतल्या कलानुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं ओलांडला बहुमताचा टप्पा, २४३ पैकी १८० पेक्षा जास्त जागांवर रालोआची जोरदार मुसंडी.

vishwatmaklokswamivarta

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री नितेश राणे

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० विभागस्तरीय प्रशिक्षण,प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षणाचा लाभ घ्या-विभागीय आयुक्त गावडे

vishwatmaklokswamivarta