vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हुंडा प्रतिबंधक कायद्याची माहिती देणाऱ्या घडीपुस्तिकेचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन हुंडा दिला/घेतला नसल्याबाबत ११६७ कुटुंबांचे प्रतिज्ञापत्र प्राप्त

हुंडा प्रतिबंधक कायद्याची माहिती देणाऱ्या घडीपुस्तिकेचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन-हुंडा दिला/घेतला नसल्याबाबत ११६७ कुटुंबांचे प्रतिज्ञापत्र प्राप्त…

सांगली, प्रतिनिधी : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडून हुंडा प्रतिबंधक कायदा, १९६१ (Dowry Prohibition Act, 1961 बाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती होणेसाठी तयार करण्यात आलेल्या घडीपुस्तिकेचे अनावरण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, यांच्या हस्ते आज करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात या घडीपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील आदि उपस्थित होते.

हुंडा घ्यायचा नाही व हुंडा द्यायचा नाही हा विचार समाजात रुजवण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली पॅटर्न हुंडामुक्ती अभियान – टप्पा १ राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रकल्पनिहाय सर्व अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत हुंडा न घेता विवाह केलेल्या जोडप्यांची माहिती घेवून लग्नावेळी लग्नातील दोन्ही पालकांकडून हुंडा न घेतल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र घेवून त्यांना या अभियानात समाविष्ठ करण्यात आले. ज्या कुटुंबामध्ये हुंडा दिला नाही अथवा घेतला नाही अशा ११६७ कुटुंबांनी प्रतिज्ञापत्र दिले. या सर्व कुटुंबांचा व अशी संकल्पना राबविल्याबद्दल जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी विशेष अभिनंदन केले.

००००

संबंधित पोस्ट

सायबर सुरक्षेबाबत जागरूकता लक्झरी नव्हे तर गरज- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

म्हैसाळ उपसा सिंचन लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज..त्वरित भरून द्यावेत…

vishwatmaklokswamivarta

जलसंधारणासाठी जालन्यात एकजूट; ‘महा वॉकेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद जलसंधारण दिनानिमित्त ‘महा वॉकेथॉन’ संपन्न

नागरिकांपर्यंत स्वतः पोहोचून योजनांचा लाभ द्या; प्रक्रिया सुलभ करा : मुख्य सचिव राजेश अग्रवाल प्रशासकीय यंत्रणेचा आढावा; दिव्यांग, शेतकरी, विद्यार्थी व ग्रामीण भागातील प्रश्नांवर तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या हस्ते जेएन पोर्ट-पीएसए मुंबई टर्मिनल (बीएमसीटी) फेज-२ चे हैद्राबाद हाऊस, नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

आरएनआय कडून ९९ हजार वृत्तपत्रांवर बंदी‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने व्यक्त केली तीव्र नाराजीस्थानिक पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न – संदीप काळे