vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या हस्ते जेएन पोर्ट-पीएसए मुंबई टर्मिनल (बीएमसीटी) फेज-२ चे हैद्राबाद हाऊस, नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या हस्ते जेएन पोर्ट-पीएसए मुंबई टर्मिनल (बीएमसीटी) फेज-२ चे हैद्राबाद हाऊस, नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन

📍 उरण, नवी मुंबई प्रतिनिधी-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या हस्ते जेएन पोर्ट-पीएसए मुंबई टर्मिनल (बीएमसीटी) फेज-२ चे हैद्राबाद हाऊस, नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झाले. तर या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगड जिल्ह्यातील जेएन पोर्ट-पीएसए मुंबई टर्मिनल (बीएमसीटी) फेज-२ उरण येथे उपस्थित होते. यावेळी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल दूरदृश्य प्रणालीद्वारे, तर खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकूर, पराग शहा, चीफ कमिश्नर कस्टम विमलकुमार श्रीवास्तव आणि ‘जेएनपीए’चे उन्मेश वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

सागरमालासारख्या प्रकल्पांमुळे देशातील सागरी व्यापार पायाभूत सुविधांमध्ये नवा अध्याय सुरू झाला असून, जेएन पोर्ट टर्मिनल देशातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणी केंद्र बनले आहे. भारत सागरी आर्थिक महासत्ता होण्यात महाराष्ट्राचे योगदान मोलाचे ठरेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

देशाची सागरी अर्थव्यवस्था महाराष्ट्रामुळे बळकट होत असून महाराष्ट्र या क्षेत्रात देशाचे नेतृत्व करेल. जेएनपीए आणि पीएसए इंडियाच्या सहकार्यामुळे हे टर्मिनल देशातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणी केंद्र बनले आहे. वाढवण बंदराच्या कार्यान्वयनामुळे आपण जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये स्थान मिळवू. भारत आणि सिंगापूर यांच्यातील सामंजस्य करारामुळे (MoUs) द्विपक्षीय सहकार्य आणखी बळकट होईल – मुख्यमंत्री

अक्षय ऊर्जेवरील पहिले कंटेनर टर्मिनल

▶️ पीएसए इंटरनॅशनलद्वारे चालवले जाणारे हे टर्मिनल १०० टक्के अक्षय ऊर्जेवर कार्यरत असून, समर्पित फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी) अनुरूप असलेले भारतातील पहिले कंटेनर टर्मिनल आहे.

▶️ या विस्तारामुळे टर्मिनलची वार्षिक हाताळणी क्षमता ४.८ दशलक्ष टीईयू इतकी झाली असून, घाटाची लांबी २००० मीटरपर्यंत वाढली आहे. यात २४ घाट क्रेन आणि ७२ रबर-टायर्ड गॅन्ट्री क्रेन (आरटीजी) यांचा समावेश आहे.

▶️ हे टर्मिनल रस्ते आणि रेल्वेद्वारे ६३ हून अधिक इनलँड कंटेनर डेपो (आयसीडी)शी जोडले गेले असून, भारतातील सर्वात व्यापक मल्टीमॉडल नेटवर्क आहे. यामुळे राज्यातील लॉजिस्टिक्स आणि व्यापार क्षेत्राला नवीन दिशा मिळेल.

#JNPA

संबंधित पोस्ट

दहावीच्या परीक्षेचे अर्ज विलंब शुल्कासह भरण्यास १७ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीत मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**मत्स्य संगोपन प्रात्यक्षिक प्रकल्पाचे उद्घाटन*

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षण २०२५ : ग्रामपंचायतींनी सर्वेक्षणासाठी सज्ज व्हावे – मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले 

मिशन भरारी’ अंतर्गत गुणवत्ताधारक विद्यार्थ्यां चे इस्रो अभ्यासदौऱ्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत होणार प्रयाण

राज्यपालांच्या उपस्थितीत नॅबचा ७४ वा स्थापना दैनंदिन साजरा-अधिकाधिक लोकांनी नेत्रदान करण्याचा संकल्प करावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी- मुंबईतील चेंबुरमध्ये एकावर गोळीबार.अज्ञात आरोपिनी गाडीतून येऊन एकावर केला गोळीबार.